अवकाळी पाऊस व गारपिटीने झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:59 IST2021-05-05T04:59:56+5:302021-05-05T04:59:56+5:30

त्यानंतर, साेमवारी महसूल व कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष पंचनामे केले. देसाईगंज तालुक्यात वादळ वारा व गारपिटीसह आलेल्या अवकाळी ...

Survey of damage due to unseasonal rains and hailstorms started | अवकाळी पाऊस व गारपिटीने झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण सुरू

अवकाळी पाऊस व गारपिटीने झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण सुरू

त्यानंतर, साेमवारी महसूल व कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष पंचनामे केले.

देसाईगंज तालुक्यात वादळ वारा व गारपिटीसह आलेल्या अवकाळी पावसाने धान पिकाचे माेठ्या प्रमाणात नुकसान केले. धान पिकाचे जवळपास ५० टक्के नुकसान झाल्याने तालुक्यातील धान उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला. या संबंधी माहिती मिळताच आ.कृष्णा गजबे तुळशी येथे प्रत्यक्ष भेट देऊन तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याचे निर्देश दिले हाेते. त्यानंतर, साेमवारी महसूल व कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन धान पिकाच्या नुकसानीचे सर्वेक्षण सुरू केले. उन्हाळी धान पिकाची लागवड केलेल्या शेती क्षेत्राचेच सर्वे करण्यात आले. झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण शंकरपूर साजाचे तलाठी चंद्रशेखर नाकतोडे व कृषी सहायक सुधारक कोहळे यांनी केले. झालेल्या नुकसानीची नोंद घेतली. यावेळी तुळशीचे सरपंच चक्रधर नाकाडे, उपसरपंच सुरेश तोंडफोडे, भास्कर तोंडफोडे व शेतकरी उपस्थित होते.

Web Title: Survey of damage due to unseasonal rains and hailstorms started