४७ रुग्णांवर शस्त्रक्रिया

By Admin | Updated: February 11, 2015 02:01 IST2015-02-11T02:01:03+5:302015-02-11T02:01:03+5:30

ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग व राणी बंग यांच्या सर्च शोधग्राम येथे घेण्यात आलेल्या शस्त्रक्रिया शिबिरात एकूण ४७ रुग्णांवर यशस्वीरीत्या शस्त्रक्रिया करण्यात आली.

Surgery on 47 patients | ४७ रुग्णांवर शस्त्रक्रिया

४७ रुग्णांवर शस्त्रक्रिया

धानोरा : ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग व राणी बंग यांच्या सर्च शोधग्राम येथे घेण्यात आलेल्या शस्त्रक्रिया शिबिरात एकूण ४७ रुग्णांवर यशस्वीरीत्या शस्त्रक्रिया करण्यात आली.
सर्च शोधग्राम येथे मॉ दंतेश्वरी रुग्णालयात ३१ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०१५ दरम्यान शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले. मॉ दंतेश्वरी मातेच्या पूजनाने या शिबिराची सुरुवात करण्यात आली. या शिबिरात हर्निया, अंगावरील गाठी, लहान मुलांचे हर्निया, जन्मजात असलेले आजार, गर्भाशयाचे आजार आदी आजारांनी ग्रस्त असलेल्या ४७ रुग्णांवर यशस्वीरीत्या शस्त्रक्रिया करण्यात आली. या शिबिरादरम्यान डॉ. राणी बंग यांनी रुग्णांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. तसेच शस्त्रक्रियेनंतरच्या काळात रुग्णांनी कोणती काळजी घ्यावी, याबाबतचे मार्गदर्शन डॉक्टरांच्या चमूने केले. शस्त्रक्रियेसाठी सातारा व सांगली येथून १५ डॉक्टरांची चमू बोलाविण्यात आली होती. शस्त्रक्रियेसाठी जनरल सर्जन डॉ. संदीप श्रोत्री, डॉ. गिरीश पेंढरकर, भूलतज्ज्ञ डॉ. माधुरी लिमये, डॉ. शिरीष लिमये, डॉ. भाकरे आदींनी मोलाची कामगिरी पार पाडली.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी सर्च येथील मॉ दंतेश्वरी रुग्णालयाचे डॉ. योगेश कालकोंडे, मृणाल कालकोंडे, ऐश्वर्या रेवाडकर, डॉ. वैभव तातावार, सुनंदा खोरगडे तसेच नर्सिंग चमूमधील नंदा सुर्वे, वर्षा लाडे, करिश्मा दर्रो, विशाखा नगराळे, अनुप गायकवाड, रवींद्र भुसारी, प्रभाकर उमरगुंडावार, प्रकाश राऊत, जयवंता कल्लो आदींनी सहकार्य केले.
याप्रसंगी शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांनी व नातेवाईकांनी आपले मनोगत व्यक्त केले. मॉ दंतेश्वरी रुग्णालयात रुग्णांची पुरेशी काळजी घेतल्या जात असल्याचे अनेक रुग्णांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Surgery on 47 patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.