लोकबिरादरीत २६७ जणांवर शस्त्रक्रिया
By Admin | Updated: January 22, 2017 01:36 IST2017-01-22T01:36:50+5:302017-01-22T01:36:50+5:30
नजीकच्या हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाच्या रूग्णालयात रोटरी क्लब नागपूर व लोकबिरादरी प्रकल्प

लोकबिरादरीत २६७ जणांवर शस्त्रक्रिया
त्रिदिवसीय शिबिर : रोटरी क्लब व लोकबिरादरी प्रकल्पाचा संयुक्त उपक्रम
भामरागड : नजीकच्या हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाच्या रूग्णालयात रोटरी क्लब नागपूर व लोकबिरादरी प्रकल्प हेमलकसाच्या संयुक्त विद्यमाने २० ते २२ जानेवारी दरम्यान तीन दिवशीय शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले आहे. शुक्रवार व शनिवार दोन दिवस मिळून डोळ्यांचे मोतीबिंदू व इतर शस्त्रक्रिया मिळून एकूण २६७ रूग्णांवर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
या शिबिरादरम्यान ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे, डॉ. मंदाकिनी आमटे, डॉ. दिगंत आमटे, डॉ. अनघा आमटे आदी उपस्थित होते. या शिबिरासाठी रोटरी क्लब नागपूरच्या डॉक्टरांची चमू हेमलकसात दाखल झाली आहे. डोळ्यांच्या मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया दोन दिवसाच्या मिळून एकूण ९७ व अपेंडिस, गर्भाशय, हर्निया आदीसह विविध रोगाने पीडित असलेल्या १७० रूग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. गडचिरोली जिल्ह्यासह तेलंगणा, छत्तीसगड राज्यातील रूग्ण येथे दाखल झाले आहेत. (प्रतिनिधी)