सुरेश पोरेड्डीवार यांचा राकाँ जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा

By Admin | Updated: December 23, 2016 01:02 IST2016-12-23T01:02:03+5:302016-12-23T01:02:03+5:30

नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला.

Suresh Porediwar's resignation resigns | सुरेश पोरेड्डीवार यांचा राकाँ जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा

सुरेश पोरेड्डीवार यांचा राकाँ जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा

गडचिरोली : नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश पोरेड्डीवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून सदर राजीनामा मंजुरीसाठी राकाँ प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्याकडे पाठविला आहे.
आपला जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा मंजूर करण्यात यावा व मला या जबाबदारीतून मुक्त करण्यात यावे, यापुढे मी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करीत राहिन, असे राजीनाम्यात सुरेश पोरेड्डीवार यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने गडचिरोली व देसाईगंज नगर परिषदेच्या सर्वच जागा लढविल्या होत्या. मात्र गडचिरोली नगर परिषदेत एकही जागा निवडून आली नाही. त्याचबरोबर देसाईगंज येथेही केवळ एका जागेवर पक्षाला समाधान मानावे लागले. गडचिरोली नगर परिषदेत नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपा यांच्यामध्ये लढत होती. मात्र या लढतीतही पराभव पत्करावा लागला.

Web Title: Suresh Porediwar's resignation resigns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.