कुनघाडा पीएचसीत अँटी रेबीज लसीचा पुरवठा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:26 IST2021-06-05T04:26:19+5:302021-06-05T04:26:19+5:30

कुनघाडा रै. केंद्रांतर्गत तळोधी, नवेगाव, गिलगाव, नवरगाव, कुथेगाव, माल्लेरमाल, भाडभिडी, मुरमुरी, येडानूर, पाविमुरांडा आदी उपकेंद्र असून ४२ गावांचा समावेश ...

Supply anti rabies vaccine at Kunghada PHC | कुनघाडा पीएचसीत अँटी रेबीज लसीचा पुरवठा करा

कुनघाडा पीएचसीत अँटी रेबीज लसीचा पुरवठा करा

कुनघाडा रै. केंद्रांतर्गत तळोधी, नवेगाव, गिलगाव, नवरगाव, कुथेगाव, माल्लेरमाल, भाडभिडी, मुरमुरी, येडानूर, पाविमुरांडा आदी उपकेंद्र असून ४२ गावांचा समावेश आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत २५ हजार ३८६ एवढी लोकसंख्या आहे. प्राथमिक उपचारासाठी परिसरातील अनेक रुग्ण येथे दाखल होतात. आरोग्य केंद्रात अनेक आजारांवर औषधसाठा उपलब्ध असला तरी कुत्र्याने चावा घेतल्यानंतर उपयाेगी ठरणारी अँटी रेबीज लस उपलब्ध नाही. कुत्रा चावलेल्या रुग्णांना बाहेरगावच्या रुग्णालयात जावे लागते. रुग्णांना फार मोठा शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो, तसेच आर्थिक नुकसानही हाेते. अँटी रेबीज लस बहुतांश प्राथमिक आराेग्य केंद्रात उपलब्ध नाही. त्यामुळे लसीचा पुरवठा करावा, अशी मागणी सरपंच अल्का धोडरे यांनी केली आहे.

===Photopath===

030621\2207img-20210603-wa0178.jpg

===Caption===

सरपंच अल्का धोडरे यांचे फोटो

Web Title: Supply anti rabies vaccine at Kunghada PHC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.