गळफास घेऊन व्यक्तीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:37 IST2021-01-23T04:37:17+5:302021-01-23T04:37:17+5:30
घाेट : येथून जवळच असलेल्या राजूर खुर्द येथील व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २२ जानेवारीला उघडकीस आली. शामराव ...

गळफास घेऊन व्यक्तीची आत्महत्या
घाेट : येथून जवळच असलेल्या राजूर खुर्द येथील व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २२ जानेवारीला उघडकीस आली. शामराव माराेती ताेकलवार (वय ६७) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
शामराव हे महिनाभरापूर्वी घरी काेणालाही न सांगता घरून निघून गेले हाेते. ते बेपत्ता असल्याबाबतची नाेंद घाेट पाेलीस मदत केंद्रात दाखल करण्यात आली हाेती. दरम्यान, मृत शामराव यांचा मुलगा अनिल शामराव ताेकलवार व भाऊ खुशाल माराेती ताेकलवार हे राजूर जंगल परिसरात कुंपणासाठी काठ्या ताेडण्याकरिता गेले असता, त्यांना एका झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत व्यक्तीचा सांगाळा दिसून आला. त्याच्या कपड्यावरून मृताची ओळख पटली असून, याबाबतची माहिती घाेट पाेलीस मदत केंद्रात देण्यात आली. घाेट पाेलिसांनी नोंद दाखल केली असून, पुढील तपास पीएसआय जनार्धन काळे यांच्या मार्गदर्शनात पाेलीस हवालदार संतदास मसराम करीत आहेत. मृत हा वेडसरपणात गळफास घेतल्याचे सांगण्यात येत असून, यापूर्वी सुद्धा तीन ते चार वेळा काेणालाही न सांगता ताे घरून निघून गेला हाेता, अशी माहिती आहे.