घर जावयाने केला सासूवर प्राणघातक हल्ला

By Admin | Updated: August 19, 2016 00:49 IST2016-08-19T00:49:11+5:302016-08-19T00:49:11+5:30

घर जावयाने सासूवर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना तालुक्यातील बामणी येथे १८ आॅगस्ट रोजी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली.

A suicide attack on his son-in-law | घर जावयाने केला सासूवर प्राणघातक हल्ला

घर जावयाने केला सासूवर प्राणघातक हल्ला

कुरखेडा : घर जावयाने सासूवर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना तालुक्यातील बामणी येथे १८ आॅगस्ट रोजी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली.
अमू हारामी हा आपल्या पत्नी, दोन मुली व मुलासह मादे येथून काही वर्षांपासून बामणी येथे वास्तव्यास आहे. त्यांनी आपल्या मुलीसाठी बामणी येथील रामचंद्र हलामी (२५) या युवकाला घर जावई म्हणून ठेवले होते. परंतु त्यांच्यामध्ये काही कारणास्तव वाद निर्माण झाला. भांडणादरम्यान गुरूवारी सासू देवकी अमू हारामी हिच्यावर धारदार चाकूने रामचंद्र हलामी याने हल्ला करून पळ काढला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जखमी देवकीला उचलून गावकऱ्यांनी खासगी वाहनाद्वारे कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
जखमीची प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचारानंतर जखमीला गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. वृत्त लिहिपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये रामचंद्र हलामी याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला नव्हता. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: A suicide attack on his son-in-law