सेंद्रिय शेतीमुळे शेणखताचे दर वधारले
By Admin | Updated: May 23, 2015 02:00 IST2015-05-23T02:00:32+5:302015-05-23T02:00:32+5:30
रासायनिक खताच्या अतीवापराने बिघडलेला जमिनीचा पोत आणि सेंद्रिय शेतीकडे वळण्यासाठी कृषी विभागाच्या तज्ज्ञांनीकडून मार्गदर्शन मिळत आहे.

सेंद्रिय शेतीमुळे शेणखताचे दर वधारले
७०० ते हजार रूपये ट्राली शेणखत : रासायनिक खताच्या वाढत्या किमतीचा परिणाम
वैरागड : रासायनिक खताच्या अतीवापराने बिघडलेला जमिनीचा पोत आणि सेंद्रिय शेतीकडे वळण्यासाठी कृषी विभागाच्या तज्ज्ञांनीकडून मार्गदर्शन मिळत आहे. तसेच रासायनिक खताच्या किमती वाढल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आता सेंद्रिय शेतीकडे वळला आहे. परिणामही शेणखताच्या किमतीही वाढल्या आहे. सध्या ग्रामीण भागात ७०० ते हजार रूपये पर्यंत शेण खताच्या एका ट्रालीला शेतकऱ्यांना पैसे मोजावे लागत आहे.
ग्रामीण भागात पशुपालक शेतकऱ्यांची सख्या मोठ्या प्रमाणात असल्याने शेणखतही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहे. शहरी भागातील तसेच मोठ्या गावातील शेतकरी शेणखतासाठी खेडेगावाकडे धाव घेत आहेत. त्यामुळे शेणखताच्या किमती वधारल्या आहे. मागील पाच वर्षांत वन हक्काच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात शेतजमिनीचे क्षेत्र वाढले. त्यामुळे नव्याने उटविण्यात आलेल्या शेत जमिनीची सुपिकता वाढविण्यासाठी शेणखताचा वापर केला जातो. त्यामुळे शेणखताची मागणी वाढली आहे.
शेतकऱ्यांना मागणीनुसार रासायनिक खताची उपलब्धतता न होणे तसेच कंपन्या व कृषी सेवा केंद्र संचालकाच्या मनमानीमुळे बांधावार खत योजनेचा फज्जा उडाला. त्यामुळे अनेक शेतकरी त्रस्त झाले. त्यामुळे यंदा शेतकरी शेणखत टाकून शेतीची सुपिकता वाढविण्यावर भर देत आहे. त्यामुळे शेणखताचे भाव चांगले वधारले आहे. (वार्ताहर)
ंरासायनिक खताचा अपुरा पुरवठा
कृषी विभागाच्या नियोजनशून्यतेमुळे शेतकऱ्यांना अनेकदा गरजेच्या वेळी रासायनिक खत मिळत नाही. मिळाले तरी काळा बाजारामुळे अधिक पैसे मोजावे लागतात. रासायनिक खताच्या वाढत्या किमती धान उत्पादक शेतकऱ्यांना परवडण्यासारख्या नाही.
- रामचंद्र क्षीरसागर, शेतकरी वैरागड
सेंद्रिय खताचे चांगले फायदे
शेणखत, तृणखत वापरण्याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती होत आहे. सेंद्रिय खताचे फायचे चांगले आहेत. आम्ही आता रासायनिक खताचा वापर करीत नाही. मागील पाच वर्षात सेंद्रिय खताचे चांगले परिणाम दिसून आले.
- महेंद्र तावेडे, शेतकरी तथा
अध्यक्ष, सेवा सहकारी संस्था, वैरागड