शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सची १० वर्षांनी स्वप्नपूर्ती! गौतम गंभीरनं केला कुणालाच न जमलेला करिष्मा
2
Kavya Maran रडली, पण SRH च्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी रोखला अश्रूंचा बांध, Video 
3
मतमोजणीवेळी बीडमधील 'या' अधिकाऱ्यांना दूर ठेवा; बजरंग सोनवणेंची निवडणूक आयोगाकडे मागणी
4
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 
5
आयर्लंडला जाणारी कतार एअरवेजची फ्लाइट टर्ब्युलन्समध्ये अडकली, 12 जखमी...
6
'रेमल' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट; पंतप्रधान मोदींनी बोलावली आढावा बैठक
7
KKR vs SRH Final : मिचेल स्टार्कने टाकला Ball of the season! हैदराबादचे ३ फलंदाज तंबूत, Video 
8
मिचेल स्टार्कमुळे जान्हवी कपूर निराश झाली; तिचा Video पाहून बेस्ट ॲक्टिंग पुरस्काराची होतेय मागणी 
9
मोठी बातमी : यजमान वेस्ट इंडिजने अखेरच्या क्षणाला संघ बदलला, अनुभवी खेळाडूची स्पर्धेतून माघार   
10
ENG vs PAK : ...म्हणूनच पाकिस्तानचा पराभव होतोय; माजी खेळाडूनं सांगितली मैदानाबाहेरील गोष्ट
11
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
12
कल्याणमधील 'तो' अ‍ॅसिड हल्ला बनावट; UPSC करणाऱ्या तरुणीचे बिंग पोलिसांनी 'असं' फोडलं
13
भांग पिऊन विमानात चढला अन्..., IndiGo फ्लाइटमध्ये प्रवाशाचा गोंधळ!
14
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
15
ओडिशात भाजपा उमेदवारावर ईव्हीएमची तोडफोड केल्याचा आरोप, तुरुंगात रवानगी
16
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
17
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
18
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
19
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
20
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."

‘त्या’ बिबट्याला जेरबंद करण्यात अखेर यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2021 5:00 AM

मानवी जीवितास धोकादायक ठरलेल्या या बिबट्याला जेरबंद करण्याचे आदेश मुख्य वनरक्षक (वन्यजीव) नागपूर यांनी दिले होते. त्या अनुषंगाने प्राप्त मार्गदर्शक सूचनेनुसार पेपर मिल परिसरात बिबट्याचा वावर असलेल्या ठिकाणी तीन पिंजरे लावण्यात आले होते. पेपरमिल कॉलनीलगत लावलेल्या पिंजऱ्यात रात्रीच्या सुमारास बिबट अडकला. सकाळी ही बाब लक्षात येताच चामोर्शीच्या पशुधन विकास अधिकाऱ्यांनी बिबट्याची आरोग्य तपासणी केली.

लाेकमत न्यूज नेटवर्कआष्टी (गडचिरोली) : आलापल्ली वन विभागांतर्गत मार्कंडा (कं) परिक्षेत्रातील इल्लूर तसेच पेपर मिल परिसरातील वसाहतीत गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले. हा बिबट पेपर मिल परिसरात लावलेल्या पिंजऱ्यात अडकला असून, सध्या तो वन विभागाच्या ताब्यात  आहे.मानवी जीवितास धोकादायक ठरलेल्या या बिबट्याला जेरबंद करण्याचे आदेश मुख्य वनरक्षक (वन्यजीव) नागपूर यांनी दिले होते. त्या अनुषंगाने प्राप्त मार्गदर्शक सूचनेनुसार पेपर मिल परिसरात बिबट्याचा वावर असलेल्या ठिकाणी तीन पिंजरे लावण्यात आले होते. पेपरमिल कॉलनीलगत लावलेल्या पिंजऱ्यात रात्रीच्या सुमारास बिबट अडकला. सकाळी ही बाब लक्षात येताच चामोर्शीच्या पशुधन विकास अधिकाऱ्यांनी बिबट्याची आरोग्य तपासणी केली. त्यानंतर त्याला सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.सदर बिबट्याला निसर्ग अधिवासात मुक्त करावे, की गोरेवाडा रेस्क्यू सेंटर नागपूर येथे हलविण्यात यावे, यासंदर्भात सोमवारला मार्कंडा वन विभागाच्या कार्यालयात एस.ओ.पी.समितीची सभा घेण्यात आली. या सभेत जेरबंद बिबट्यास निसर्ग अधिवासात मुक्त करणे धोकादायक असल्याने गोरेगाव रेस्क्यू सेंटर नागपूर येथे पाठविण्याची शिफारस करण्यात आली, अशी माहिती मार्कंडाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी भारती राऊत यांनी दिली.दोघांचा घेतला जीव, पशुधनाचीही हानीमागील काही दिवसांपासून या बिबट्याने पेपरमिल व इल्लूर येथे दहशत निर्माण केली होती. बिबट्याच्या हल्ल्यात एक आठ वर्षाचा मुलगा व एका इसमाला जीव गमवावा लागला होता. याशिवाय बिबट्याच्या हल्ल्यात काही पशुधनाचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती.

 

टॅग्स :leopardबिबट्या