अवैध जमीन हस्तांतरण अहवाल सादर करा

By Admin | Updated: March 14, 2015 00:20 IST2015-03-14T00:20:04+5:302015-03-14T00:20:04+5:30

गडचिरोली जिल्ह्यात आदिवासींच्या जमिनीचे फेरफार करण्यात आले. मात्र विक्री करण्यात आली नाही. तक्रार करूनही आदिवासींच्या जमिनी आदिवासी परत मिळाल्या नाही.

Submit an illegal land transfer report | अवैध जमीन हस्तांतरण अहवाल सादर करा

अवैध जमीन हस्तांतरण अहवाल सादर करा

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात आदिवासींच्या जमिनीचे फेरफार करण्यात आले. मात्र विक्री करण्यात आली नाही. तक्रार करूनही आदिवासींच्या जमिनी आदिवासी परत मिळाल्या नाही. त्यामुळे संबंधित सर्व महसूल कर्मचाऱ्यांनी अवैध जमीन हस्तांतरण अहवाल तहसीलदार, उपविभागीय अधिकारी व हस्तांतरण अभ्यास समितीकडे पाठवावा, अशा सूचना आदिवासी जमिन हस्तांतरण समितीच्या उपप्रमुख अ‍ॅड. पौर्णिमा उपाध्याय यांनी केल्या.
विदर्भ विकास मंडळांतर्गत आदिवासी जमीन हस्तांतरण अभ्यास समितीच्या वतीने आज शुक्रवारी पोटेगाव मार्गावरील गोंडवाना कला दालनात जमीन हस्तांतरण प्रश्नाबाबत जनसुनावणी घेण्यात आली. यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी समितीचे सदस्य दिलीप गोडे, महादेव चिलाटे, माजी आमदार हिरामन वरखडे, देवाजी तोफा, तहसीलदार डी. जी. जाधव, तहसीलदार अजय चरडे, सिरोंचाचे तहसीलदार के. बी. मिश्रा, तहसीलदार भंडारी आदी उपस्थित होते. या जनसुनावणीत आदिवासी नागरिकांनी आपल्या जमीन हस्तांतरण व विक्री संदर्भात समस्या मांडल्या. यावर समितीच्या सदस्यांनी जमिनीचे मूळ कागदपत्रे मिळवून अर्जासह तहसीलदार व उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सादर करावेत, असे सांगितले. आदिवासींच्या जमिनी आदिवासींना परत द्याव्या, त्याचे हस्तांतरण होऊ शकत नाही, असा उच्च न्यायालयाचा निर्णय असताना सुध्दा अनेक आदिवासी नागरिकांच्या जमिनी गैरआदिवासींकडेच कायम आहेत, असे माजी आमदार हिरामन वरखडे यांनी जनसुनावणी करून सदस्यांना सांगितले. विशेष म्हणजे सदर प्रकार धानोरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात असल्याचेही ते म्हणाले.
या जनसुनावणीला जिल्ह्यात नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठी बहुसंख्येने उपस्थित होते.

Web Title: Submit an illegal land transfer report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.