पैठणकर दाम्पत्यावर गुन्हा दाखल करा
By Admin | Updated: December 29, 2014 23:43 IST2014-12-29T23:43:35+5:302014-12-29T23:43:35+5:30
तीन ते पाच वर्षात पैसे दुप्पट करण्याचे आमिष देत वासनकर वेल्थ इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक करणाऱ्या मिलिंद अनंतराव पैठणकर व माधुरी मिलिंद

पैठणकर दाम्पत्यावर गुन्हा दाखल करा
गडचिरोली : तीन ते पाच वर्षात पैसे दुप्पट करण्याचे आमिष देत वासनकर वेल्थ इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक करणाऱ्या मिलिंद अनंतराव पैठणकर व माधुरी मिलिंद पैठणकर यांच्या विरोधात कारवाई करून गुंतवणूक केलेली रक्कम परत करण्यात यावी, अशी मागणी अन्यायग्रस्तांनी केली आहे.
पैठणकर यांच्यामुळे पीडित असलेल्या नागरिकांनी आलापल्ली येथे २८ डिसेंबर रोजी सभा आयोजित केली. या सभेत वासनकर वेल्थ इन्व्हेस्टमेंट कंपनीकडे गुंतवणूक केलेली रक्कम परत मिळावी, यासाठी सर्व बाबीने विचार करण्यात आला. सभेमध्ये बल्लारपूर पेपरमिलच्या आलापल्ली येथील कार्यालयात व्यवस्थापक असताना दबाव टाकून गुंतवणुकीसाठी रोख रक्कम वसूल करणाऱ्या मिलिंद पैठणकर यांच्याविरोधात अहेरी पोलिसात तक्रार करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. त्याचबरोबर राज्य शासनाकडे निवेदनसुद्धा पाठविण्यात आले.
मिलिंद पैठणकर व माधुरी पैठणकर यांनी सुहास श्रीराम मोटे यांच्याकडून २ लाख ९४ हजार २४१, मनीष श्रीराम मोटे यांच्याकडून ६ लाख ३५ हजार ६००, अरूण रमनी मिस्त्री यांच्याकडून १४ लाख ७० हजार, आर. जी. पडगीलवार यांच्याकडून ५ लाख ४० हजार, पी. एन. मोहुर्ले यांच्याकडून ४ लाख २५ हजार, एम. एन. देशमुख ४ लाख ७५ हजार, आसिफ खान नूर खान पठाण यांच्याकडून ८१ हजार २५०, एन. के. शहा यांच्याकडून २ लाख ७५ हजार, आर. पी. अवधानी यांच्याकडून ७ लाख २५ हजार, रणजीत रमणी मिस्त्री यांच्याकडून ५० हजार, सुक्कु पुस्सु तिम्मा यांच्याकडून २ लाख ५० हजार, सोमाजी मालु पुंगाटी २ लाख २८ हजार, सुधाकर वाढई २ लाख ८१ हजार २५०, ए. राजवंशी १ लाख ५० हजार, बी. टी. तुरकर ६ लाख, मुंशी विज्जा पुंगाटी १ लाख, मैनु मुरा आत्राम ५० हजार, एस. डी. वैद्य १ लाख २५ हजार, शंकर चापले १ लाख, रंजना आर. मडावी ५० हजार, रामचंद्र पुजारी यांच्याकडून १ लाख रूपये, असे एकूण ६४ लाख ६१ हजार १०० रूपये वसूल करून त्यांची फसवणूक केली आहे.
त्यामुळे या सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून यामध्ये दोषी असलेल्या मिलिंद अनंतराव पैठणकर व माधुरी मिलिंद पैठणकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. कारवाई न केल्यास आंदोलनाचाही इशारा दिला आहे (जिल्हा प्रतिनिधी)