शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
3
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
6
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
7
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
8
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ
9
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
10
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
11
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
12
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
13
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
14
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
15
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
16
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
17
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
18
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
19
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
20
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 

उपनिरीक्षक, पोलीस नक्षली हल्ल्यात शहीद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2020 07:28 IST

शीघ्र कृती पथक (क्यूआरटी) आणि विशेष अभियान पथकाचे जवान रविवारी सकाळी ६ वाजेपासून संयुक्तपणे नक्षलविरोधी अभियान राबवीत होते.

गडचिरोली : नक्षलवाद्यांनी केलेल्या गोळीबारात पोलीस उपनिरीक्षक धनाजी होनमाने (३०) आणि जवान किशोर आत्राम (ब.नं.५२०१) हे शहीद झाले. याशिवाय एक जवान जखमी झाला. ही घटना रविवारी सकाळी भामरागड उपविभागांतर्गत येणाऱ्या कोठी पोलीस मदत केंद्र परिसरात पोयरकोटी-कोपर्शी जंगल परिसरात घडली.शीघ्र कृती पथक (क्यूआरटी) आणि विशेष अभियान पथकाचे जवान रविवारी सकाळी ६ वाजेपासून संयुक्तपणे नक्षलविरोधी अभियान राबवीत होते. ६.३०च्या सुमारास दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी अचानक गोळीबार केला. पोलिसांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. पण नक्षलवाद्यांच्या गोळीने क्युआरटी पथकाचे उपनिरीक्षक होनमाने आणि जवान आत्राम यांचा वेध घेतला. तसेच दसरू कुरचामी हा जवान जखमी झाला. या चकमकीत ४ ते ५ नक्षलवादीही ठार झाले असण्याची शक्यता पोलीस विभागाने वर्तविली आहे. चकमकीनंतर अतिरिक्त कुमक पाठवून त्या भागात नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आले. दुपारी जखमी जवानासह दोन्ही मृतदेह पोलीस दलाकडील हेलिकॉप्टरने गडचिरोलीत आणण्यात आले. गंभीर जखमी दसरू कुरचामी यांना पुढील उपचारासाठी हेलिकॉप्टरने नागपूरला हलविण्यात आले.सायंकाळी पोलीस दलातर्फे दोन्ही शहिदांना मानवंदना देण्यात आली. यावेळी चंद्रपूर जिल्ह्याच्या भेटीवर असलेले पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.सन्मानित होण्याआधीच वीरमरणपोलीस उपनिरीक्षक धनाजी होनमाने हे सोलापूर जिल्ह्याचे सुपुत्र आहेत. पंढरपूर तालुक्यातील पुळूज हे त्यांचे मूळ गाव असून ते आॅगस्ट २०१७ पासून गडचिरोली येथे कार्यरत होते. उपनिरीक्षक म्हणून त्यांची येथील पहिलीच नियुक्ती होती. महाराष्टÑ दिनाच्या पूर्वसंध्येला त्यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर झाले होते. पण तो सन्मान स्वीकारण्याआधीच त्यांना शहीद व्हावे लागले.

टॅग्स :PoliceपोलिसGadchiroliगडचिरोली