सामाजिक दृष्टिकोनातून तंत्रज्ञानाचा अभ्यास करा
By Admin | Updated: March 3, 2016 01:27 IST2016-03-03T01:27:47+5:302016-03-03T01:27:47+5:30
अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी सामाजिक दृष्टिकोन ठेवून आपल्या देशातील तंत्रज्ञानाचा अभ्यास करावा, असे आवाहन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नामदेव कल्याणकर यांनी केले.

सामाजिक दृष्टिकोनातून तंत्रज्ञानाचा अभ्यास करा
कुलगुरूंचे आवाहन : टेक्निकल फेस्टिवल
गडचिरोली : अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी सामाजिक दृष्टिकोन ठेवून आपल्या देशातील तंत्रज्ञानाचा अभ्यास करावा, असे आवाहन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नामदेव कल्याणकर यांनी केले.
स्थानिक नामदेवराव पोरेड्डीवार अभियांत्रिकी महाविद्यालयात मंगळवारी आयोजित टेक्निकल फेस्टिवल टेक्नोपर्व २ के १६ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी विशेष अतिथी म्हणून डॉ. झेड. जे. खान, प्राचार्य डॉ. प्रवीण पोटदुखे, बलबिलसिंग गुरम उपस्थित होते.
यावेळी पेपर प्रेझेंटेशन, पोस्टर पे्रझेंटेशन स्पर्धा घेण्यात आली. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी नवीन संकल्पना विकसित केल्या पाहिजे, असे डॉ. खान यांनी सांगितले. प्राचार्य डॉ. पोटदुखे यांनी सामान्य माणसाच्या समस्या आधुनिक तंत्रज्ञानातून सुटल्या पाहिजे, अशी आशा व्यक्त केली. कार्यक्रमाला पराग मेश्राम, प्रीया कोस्टी, प्रा. सिंह आदींसह अभियांत्रिकीचे विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमात करिअर व तांत्रिक विषयावर मौलीक मार्गदर्शन करण्यात आले. (स्थानिक प्रतिनिधी)