नदीतील कीटकांचा अभ्यास

By Admin | Updated: March 15, 2015 01:17 IST2015-03-15T01:17:07+5:302015-03-15T01:17:07+5:30

स्थानिक महात्मा गांधी कला, विज्ञान व स्व. न. पं. वाणिज्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आरमोरी, कासवी नदी पात्राच्या परिसरातील कीटकांचा अभ्यास

Study of river pests | नदीतील कीटकांचा अभ्यास

नदीतील कीटकांचा अभ्यास

आरमोरी : स्थानिक महात्मा गांधी कला, विज्ञान व स्व. न. पं. वाणिज्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आरमोरी, कासवी नदी पात्राच्या परिसरातील कीटकांचा अभ्यास केला करून त्याविषयीचा अहवाल प्राणीशास्त्र विभागास सादर केला आहे.
शेती व उद्योगांमध्ये कीटकनाशकांचा वापर केला जातो. त्यामुळे नदी व नाल्यातील पाणी प्रदूषित झाले आहे. त्याचबरोबर नदी सभोवतालच्या परिसरात काळानुरूप बदल होत असल्याने त्या परिसरात राहणाऱ्या किटक व जीवसृष्टीवरही परिणाम पडतो. यातील बदल जाणून घेण्याच्या दृष्टीने कीटकांचा अभ्यास केला. सदर अभ्यास प्रा. जयेश पापडकर व प्रा. डॉ. राजेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शन करण्यात आला.
या प्रोजेक्ट रिपोर्टचे विमोचन प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा व प्रा. डॉ. गोपाल तामगाडे यांच्या हस्ते झाले. प्रोजेक्ट व संशोधनासाठी शीतल भानारकर, रूपाली भुसारी, मिनाक्षी चोपकार, उज्ज्वला बिडवाईकर, उद्धव बुद्धे, रूपेश रामटेके, कपील प्रधान, धनराज काळबांधे, खुशाल रामटेके, धिरज निमगडे, सचिन काळबांधे यांनी सहकार्य केले.

Web Title: Study of river pests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.