शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
3
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
4
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
5
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
6
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
8
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
9
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
10
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
11
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
12
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
13
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
14
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
15
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
16
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
17
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
18
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
19
उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...
20
दौडा दौडा... भागा भागा सा... प्रचार करताना दमछाक

विद्यार्थ्यांना कृतीतून मिळणार इंग्रजी व गणिताचे शिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 6:00 AM

गणित हा विषय रटाळ मानला जातो. त्यामुळे या दोन्ही विषयांचे तास सुरू होताच विद्यार्थ्यांना झोप येण्यास सुरूवात होते. ही अडचण लक्षात घेऊन डीआयईसीपीडीतर्फे गणित व इंग्रजी विषयांची कृतीपुस्तिका तयार केली आहे. यामध्ये वेगवेगळे घटक कोणती कृती करून शिक्षकाने शिकवावे, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देशिक्षकांसाठी मार्गदर्शक : डीआयईसीपीडीने तयार केली कृतीपुस्तिका; नावीन्यपूर्ण उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : इंग्रजी व गणित हे कठीण मानले जाणारे विषय विद्यार्थ्यांना कृतीतून शिकविल्यास अध्ययन क्रिया सुलभ होण्यास मदत होईल. या उद्देशाने गडचिरोली डीआयईसीपीडीचे प्राचार्य, अधीव्याख्याता व विषय सहाय्यकांनी कृतीपुस्तिका तयार केली. या कृती पुस्तीकेचे विमोचन गुरूवारी करण्यात आले.कोणताही विषय विद्यार्थ्यांना कृतीतून व शैक्षणिक साहित्यांचा वापर करून शिकविल्यास त्यांना लवकर समजण्यास मदत होते. ही बाब प्रत्येक शिक्षकाला व शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला माहित आहे. मात्र अध्यापन करताना प्रत्यक्ष कृती कशी करावी, हे कळत नाही. इंग्रजी हा वेगळी भाषा असलेला विषय आहे. त्यामुळे तो अनेक विद्यार्थ्यांच्या डोक्यावरून जातो. गणित हा विषय रटाळ मानला जातो. त्यामुळे या दोन्ही विषयांचे तास सुरू होताच विद्यार्थ्यांना झोप येण्यास सुरूवात होते. ही अडचण लक्षात घेऊन डीआयईसीपीडीतर्फे गणित व इंग्रजी विषयांची कृतीपुस्तिका तयार केली आहे. यामध्ये वेगवेगळे घटक कोणती कृती करून शिक्षकाने शिकवावे, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले आहे. सदर कृतीपुस्तिका जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यभरातील शिक्षकांसाठी महत्त्वाची ठरणार आहे.कृतीपुस्तिकेचे विमोचन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डीआयईसीपीडीचे प्राचार्य शरचंद्र पाटील, शिक्षणाधिकारी राघवेंद्र मुनघाटे, वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ.विनीत मत्ते, संभाजी भोजने, अधिव्याख्यात मिलींद अघोर, वैशाली येगलोपवार, पुनीत मातकर उपस्थित होते. संचालन कुणाल कोवे यांनी केले.सीईओंनी केली प्रशंसाविमोचनानंतर सीईओ डॉ.राठोड यांनी कृतीपुस्तिकेची पाहणी केली. या कृतीपुस्तिकेत गणित व इंग्रजी विषयासाठी अनेक कृती दिल्या असल्याचे लक्षात आले. मार्गदर्शन करताना डॉ.राठोड म्हणाले, २१ व्या शतकातील विद्यार्थ्यांसमोरील आव्हाने लक्षात घेता केवळ पाठ्यपुस्तकातून अध्ययन निष्पत्ती साध्य होईलच असे नाही. त्यासाठी प्रत्यक्ष कृती, अनुभव अत्यंत महत्त्वाचा आहे. कृती व अनुभव देण्याचे काम कृतीपुस्तिका करणार आहे. गडचिरोली डीआयईसीपीडीने तयार केलेली कृतीपुस्तिका जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यभरातील शिक्षकांसाठी मार्गदर्शक ठरेल, असे गौरवोद्गार काढले.

टॅग्स :Educationशिक्षण