समाजाच्या विकासासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावे
By Admin | Updated: January 16, 2017 00:59 IST2017-01-16T00:59:02+5:302017-01-16T00:59:02+5:30
विद्यार्थी हाच खरा समाज घडविणारा मुख्य आधारस्तंभ आहे. शिक्षणासोबतच आपला विकास व पर्यायाने समाजाचा विकास करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सदैव तत्पर राहावे, ...

समाजाच्या विकासासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावे
नगराध्यक्षांचे प्रतिपादन : गोविंदपूर येथे रासेयो शिबिराचे उद्घाटन
गडचिरोली : विद्यार्थी हाच खरा समाज घडविणारा मुख्य आधारस्तंभ आहे. शिक्षणासोबतच आपला विकास व पर्यायाने समाजाचा विकास करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सदैव तत्पर राहावे, याकरिता पालक व नागरिकांनीसुद्धा पोषक वातावरण निर्माण करावे, असे प्रतिपादन गडचिरोलीच्या नगराध्यक्ष योगिता पिपरे यांनी केले.
इंदिरा गांधी महाविद्यालयाच्या वतीने गोविंदपूर येथे आयोजित राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी नगराध्यक्ष पिपरे बोलत होत्या. मातृभूमी सेवा शिबिराचे उद्घाटन नगर पालिकेचे माजी सभापती तथा भाजपचे ज्येष्ठ नेते प्रमोद पिपरे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक सचिव प्रकाश अर्जुनवार होते. यावेळी डॉ. भारत खटी, विलास भांडेकर, संजय बारापात्रे, सरपंच गीता सोमनकर उपस्थित होत्या. कार्यक्रमादरम्यान अर्जुनवार व सरपंच सोमनकर यांच्या हस्ते नगराध्यक्ष पिपरे यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. दरम्यान उपस्थित मान्यवरांनी विचार व्यक्त केले. अर्जुनवार यांनी रासेयो शिबिरात विद्यार्थी समाजसेवेचे व्रत स्वीकारतात, असे प्रतिपादन केले. संचालन प्रा. प्रवीण सिडाम, प्रास्ताविक प्रा. प्रमोद सहारे तर आभार प्रा. सुनील गोंगले यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्रा. राजन बोरकर, प्रा. दिगांबर पिपरे, प्रा. तुषार कोपुलवार, प्रा. अनिल भोयर, प्रीती मडावी, छत्रपती कोडाप, गायत्री चन्नावार, गंगाधर सिडाम, श्वेता सहारे यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)