परिपूर्ण तयारीने विद्यार्थ्यांनी गुणवत्ता सिद्ध करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:24 IST2021-06-28T04:24:50+5:302021-06-28T04:24:50+5:30
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिराेलीच्या वतीने येथील शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळेत रविवार २७ जून राेजी आयाेजित केलेल्या एमपीएससी, यूपीएससी ...

परिपूर्ण तयारीने विद्यार्थ्यांनी गुणवत्ता सिद्ध करावी
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिराेलीच्या वतीने येथील शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळेत रविवार २७ जून राेजी आयाेजित केलेल्या एमपीएससी, यूपीएससी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरात प्रमुख वक्ते म्हणून ते बाेलत हाेते.
पुढे बाेलताना येरेकर म्हणाले, आपण कुठली परीक्षा देत आहाेत याबाबत अभ्यासाकडे आपले पूर्ण लक्ष केंद्रित करावे. ध्येय समाेर ठेवून विचलित न हाेता नियमित अभ्यास करावा. यासाठी लागणारी पुस्तके, संदर्भ पुस्तके व इतर साहित्यांचे अचूक वाचन करावे. वर्तमानपत्रांचे नियमित वाचन करून त्यातून आवश्यक नाेंदी घ्याव्यात. अभ्यासात कुठेही मागे पडणार नाही, याची काळजी घ्यावी. सातत्याने प्रयत्नशील राहिल्यास यशाच्या मार्गाकडे जाता येते, असा विश्वास विद्यार्थ्यांनी आपल्या मनात निर्माण करावा, असे आवाहन करून स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने उपयुक्त व विस्तृत मार्गदर्शन केले.
तत्पूर्वी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर व वीर बाबूराव शेडमाके यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलित करून झाले. मार्गदर्शन शिबिराला प्रमुख वक्ते म्हणून धानाेरा नगरपंचायतचे मुख्याधिकारी डाॅ. नरेंद्र बेंबरे उपस्थित हाेते. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन प्रश्नाेत्तराच्या माध्यमातून करण्यात आले. यापुढेही हाेणाऱ्या स्पर्धापरीक्षा मार्गदर्शनाचा लाभ जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. याप्रसंगी सहायक प्रकल्प अधिकारी अनिल साेमनकर, प्रभू सादमवार, प्रमाेद वरगंटीवार, मुख्याध्यापिका डी. एच. जुमनाके प्रामुख्याने उपस्थित हाेते.
संचालन व आभार प्राथमिक शिक्षक संदीप राठाेड यांनी केले. यशस्वीतेसाठी विलास मडावी, भूषण साठवणे, गुलाब डाेंगरवार, प्रतिभा बानाईत, सुनीता झाडे, यशपाल पेंदाम व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
बाॅक्स
सकारात्मक दृष्टिकाेनातून अभ्यास करावा : डाॅ. नरेंद्र बेंबरे
एमपीएससी, यूपीएससीसारख्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या कुठल्या भागावर भर द्यावा, हे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. नाेट्स कसे काढावे, काढलेल्या नाेट्समधून अभ्यास कसा करावा याचा विचार करून तयारी करावी. तसेच स्वत:ला कुठेही कमी न समजता सकारात्मक दृष्टिकाेनातून अभ्यास करावा, असे आवाहन करून धानाेरा नगरपंचायतचे मुख्याधिकारी डाॅ. नरेंद्र बेंबरे यांनी स्पर्धा परीक्षा तयारीबाबत विस्तृत मार्गदर्शन केले.