विद्यार्थ्यांनी उच्च ध्येय व महत्त्वाकांक्षा बाळगावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:28 IST2021-01-10T04:28:18+5:302021-01-10T04:28:18+5:30
गडचिराेली : विद्यार्थ्यांनी जीवनात अल्पसंतुष्ट राहू नये, त्यांची शिक्षणाची भूक सतत वाढली पाहिजे, यासाठी त्यांनी उच्च शिक्षण व उच्च ...

विद्यार्थ्यांनी उच्च ध्येय व महत्त्वाकांक्षा बाळगावी
गडचिराेली : विद्यार्थ्यांनी जीवनात अल्पसंतुष्ट राहू नये, त्यांची शिक्षणाची भूक सतत वाढली पाहिजे, यासाठी त्यांनी उच्च शिक्षण व उच्च ध्येयाची महत्त्वाकांक्षा बाळगावी, असे आवाहन डाॅ. साळवे नर्सिंग काॅलेज चातगावचे संस्थापक अध्यक्ष डाॅ. प्रमाेद साळवे यांनी केले. जीएनएमचे शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थिनींचा सत्कार कार्यक्रम शुक्रवारी नर्सिंग काॅलेजमध्ये घेण्यात आला. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बाेलत हाेते.
याप्रसंगी नर्सिंग अभ्यासक्रमाचे अंतिम वर्ष उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. प्रमुख अतिथी म्हणून लावण्या साेनुले, सुशांत रच्चवार आदी उपस्थित हाेते. कार्यक्रमाचे संचालन अबाेली त्रिसुले, प्रास्ताविक शीतल पदा यांनी केले तर आभार पूजा रामटेके यांनी मानले.
कार्यक्रमासाठी साक्षी मडावी, वनश्री दाजगाये, निकिता सडमेक, पूजा भांडेकर, श्रद्धा सलाम, प्रांजली वलके, करिश्मा मेश्राम, नंदीकिनी मडावी, उज्ज्वला ताडाम, वैशाली मडावी, प्रतिभा रामटेके, रविना फुलकवर, ममता मेश्राम, प्रियांका तलांडे, संजना सेडमेक, प्रियांका कावळे, प्राची नंदेश्वर, प्राची साेमवंशी, संध्या लाेहबले, तेजस्विनी काेडवते, काेमल टेकाम, काेमल वाकाेडे, अर्पणा तुलावी, शीतल रामटेके, नीतेश आलाम, सुशील निकेसर, शिवानी गड्डलवार, प्रशांत सातपुडके, पूनम वट्टी, मयूरी गडपायले, धीरज वानखेडे, आकाश निमगडे, कुणाल हुलके, दर्शन मेश्राम आदींनी सहकार्य केले.
(बॉक्स)
३० पैकी २८ विद्यार्थिनी यशस्वी
डॉ. साळवे नर्सिंग कॉलेजचा निकाल ९३ टक्के लागला आहे. ३० पैकी २८ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. त्यात ९ विद्यार्थिनी प्रथम श्रेणीत आहेत. प्रथम क्रमांक प्रगती साळवे, द्वितीय काजल उडाण तर तृतीय क्रमांनी सोनिया काटकुरवार यांनी पटकावला आहे. संस्थापक संचालक डॉ. प्रमोद साळवे, प्राचार्य तादोरी, शिक्षक ऋतुजा कांबळे, नलू गावठे, सैय्यद हुसैन आदींनी त्यांना मार्गदर्शन केले.