विद्यार्थ्यांनी उलगडले गांधीजींचे व्यक्तिमत्त्व
By Admin | Updated: October 4, 2014 23:27 IST2014-10-04T23:27:31+5:302014-10-04T23:27:31+5:30
अहिंसेच्या मार्गाने भारताला स्वातंत्र मिळवून देण्याबरोबरच जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे व्यक्तिमत्त्व उलगडण्याचा प्रयत्न गडचिरोली येथील विद्यार्थ्यांनी निबंध

विद्यार्थ्यांनी उलगडले गांधीजींचे व्यक्तिमत्त्व
गडचिरोली : अहिंसेच्या मार्गाने भारताला स्वातंत्र मिळवून देण्याबरोबरच जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे व्यक्तिमत्त्व उलगडण्याचा प्रयत्न गडचिरोली येथील विद्यार्थ्यांनी निबंध स्पर्धेदरम्यान केला. गांधीजींच्या जीवनाबद्दलचे विद्यार्थ्यांनी निबंधाच्या माध्यमातून व्यक्त केलेले विचार वाचून मान्यवरही मंत्रमुग्ध झाले.
लोकमत बालविकास मंच व गोंडवाना सैनिकी विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने गांधी जयंतीनिमित्त महात्मा गांधी यांचे व्यक्तिमत्त्व, विचार व कार्य या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली. वर्ग ५ ते ७ च्या विद्यार्थ्यांचा अ गट व ८ ते १० पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा ब गट पाडण्यात आले होते. सदर स्पर्धा २ आॅक्टोबर रोजी गोंडवाना सैनिकी विद्यालयात घेण्यात आली. याप्रसंगी उद्घाटक व प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. राहुल खाडे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोेंडवाना सैनिकी विद्यालयाचे प्राचार्य संजय भांडाकर होते. प्रमुख अतिथी म्हणून लोकमत सखी मंचच्या सहसंयोजिका सोनिया बैस, बाल विकास मंचच्या जिल्हा संयोजिका किरण पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
निबंध स्पर्धेत अ गटातून प्रथम क्रमांक गोंडवाना सैनिकी विद्यालयाचा विद्यार्थी युग उरकुंटवार, द्वितीय क्रमांक कारमेल हायस्कूलचा विद्यार्थी सार्थक संजय खांडरे याने पटकाविला. गोंडवाना सैनिकी विद्यालयाचे सुरज वसंत गव्हारे, अथर्व श्रीपदवार, रोहित रामटेके यांना प्रोत्साहनपर पारितोषिक देण्यात आले. ब गटात प्रथम पारितोषिक गोंडवाना सैनिकी विद्यालयाचा साहिल मोगरे, द्वितीय क्रमांक दिव्यानी दिलीप कांबळे यांनी पटकाविला. प्रोत्साहनपर पारितोषिक शिवाजी विद्यालयाचा ओंकार कुटे व गोंडवाना सैनिकी विद्यालयाचे शुभम कन्नाके व डेनिस उईके यांनी पटकाविला. प्रथम येणाऱ्यास १ हजार रूपये, द्वितीय येणाऱ्यास ५०० रूपये व प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून १०० रूपये रोख देण्यात आले. संचालन कुळमेथे तर आभार रेचनकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी उंदीरवाडे यांच्यासह शाळेतील शिक्षकांनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)