जिल्ह्यात विद्यार्थ्यांनी दिली शिष्यवृत्ती परीक्षा
By Admin | Updated: February 28, 2017 00:52 IST2017-02-28T00:52:03+5:302017-02-28T00:52:03+5:30
पूर्व उच्च माध्यमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा रविवारी घेण्यात आली. या परीक्षेत इयत्ता पाचवी व आठवीचे हजारो विद्यार्थी प्रविष्ट झाले.

जिल्ह्यात विद्यार्थ्यांनी दिली शिष्यवृत्ती परीक्षा
पाचवी व आठवीचे विद्यार्थी : चामोर्शी, आरमोरी, आष्टी, अंकिसा केंद्रावर विद्यार्थी प्रविष्ट
चामोर्शी/आरमोरी/आष्टी/अंकिसा : पूर्व उच्च माध्यमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा रविवारी घेण्यात आली. या परीक्षेत इयत्ता पाचवी व आठवीचे हजारो विद्यार्थी प्रविष्ट झाले.
चामोर्शी येथे जा. कृ. बोमनवार विद्यालयाच्या केंद्रावर २०१ विद्यार्थी प्रविष्ट झाले. यावेळी केंद्रप्रमुख व्ही. बी. वन्नेवार, सहायक केंद्रप्रमुख एन. डब्ल्यू. कापगते यांनी परीक्षेचे काम पाहिले. जि. प. केंद्र शाळेच्या केंद्रावर इयत्ता पाचवीचे ११२ विद्यार्थी प्रविष्ट झाले. येथे केंद्रप्रमुख एस. एस. खेवले यांनी काम पाहिले. शिवाजी हायस्कूलच्या केंद्रावर इयत्ता आठवीचे १४८ विद्यार्थी प्रविष्ट झाले. येथे बी. एच. शिल यांनी केंद्रप्रमुख जबाबदारी पाहिली. यावेळी बैठे पथकात नरेंद्र कोत्तावार, गणेश बोईनवार, भांडेकर यांनी कामगिरी पार पाडली. कृषक हायस्कूलमध्ये ३८ विद्यार्थी प्रविष्ट झाले. येथे एम. आर. बुराडे यांनी केंद्रप्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडली.
आरमोरी येथे महात्मा गांधी उच्च माध्यमिक शाळा , महात्मा गांधी विद्यालय , डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यालय , व हितकारिणी विद्यालय व तालुक्यातील दहा केंद्रावर शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत बहुसंख्य विद्यार्थी प्रविष्ट झाले.
आष्टी येथील राजे धर्मराव हायस्कूलच्या केंद्रावर १३९ विद्यार्थ्यांपैकी १३४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. या परीक्षेत केंद्रप्रमुख म्हणून बारसागडे यांनी काम पाहिले. महाराष्ट्र राज्य संशोधन मंडळ पुणेतर्फे घेण्यात आलेल्या पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हाभरात शेकडो विद्यार्थी प्रविष्ट झाले. सर्व केंद्रांवर उत्तम व्यवस्था प्रशासनाच्या वतीने करण्यात आली होती.
अंकिसा येथील श्रीनिवास हायस्कूलच्या केंद्रावर पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत इयत्ता पाचवी व आठवीचे विद्यार्थी प्रविष्ट झाले. अंकिसा, आसरअल्ली, नडीकुडा येथील विद्यार्थ्यांनी परीक्षेत सहभाग दर्शविला. इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत १०० विद्यार्थी बसणार होते. परंतु २१ विद्यार्थी अनुपस्थित राहिले. इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेला ६७ विद्यार्थ्यांपैकी ५८ विद्यार्थी प्रविष्ट झाले. ९ विद्यार्थी अनुपस्थित होते. केंद्रावर केंद्र संचालक म्हणून डी. ए . कोरेवार, व्ही. एस. पुरकलवार, मुख्याध्यापक एम. टी. वाढई, एम. ए. मेश्राम, टी. व्ही. शेट्टीवार, झोरे, ए. आय. रोकडे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)