मेंढाटाेला येथे विद्यार्थिनीचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:43 IST2021-02-17T04:43:36+5:302021-02-17T04:43:36+5:30
चातगाव : कोरोनाकाळात प्रथम संस्थेने आकाशवाणी नागपूर केंद्रावर शाळा बाहेरची शाळा हा उपक्रम सुरू करून विद्यार्थ्यांना आपले शैक्षणिक ...

मेंढाटाेला येथे विद्यार्थिनीचा सत्कार
चातगाव : कोरोनाकाळात प्रथम संस्थेने आकाशवाणी नागपूर केंद्रावर शाळा बाहेरची शाळा हा उपक्रम सुरू करून विद्यार्थ्यांना आपले शैक्षणिक विचार मांडण्यासाठी एक स्वतंत्र असे व्यासपीठ निर्माण करून दिले. या कार्यक्रमांतर्गत ‘शाळा बाहेरची शाळा’ यात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मेंढाटोला येथील इयत्ता सहावीची विद्यार्थिनी रेखा विलास चापले व तिचे वडील विलास चापले आणि आई वेणू चापले यांना १० फेब्रुवारीच्या १०३ व्या भागात सहभागी होण्याची संधी मिळाली. लाॅकडाऊन काळात पालकांनी शिक्षकांच्या मदतीने विद्यार्थ्यांचा अभ्यास कसा घेतला, याबाबत त्यांनी माहिती दिली. या उपक्रमास मुख्याध्यापिका अरुणा लांजेकर, वर्गशिक्षक जनबंधू यांनी कशाप्रकारे मदत केली याबाबत सविस्तर माहिती रेखाने दिली. रेडिओ कार्यक्रमात सहभाग घेण्याची संधी मिळाल्याबद्दल शाळेतर्फे रेखाचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी केंद्रप्रमुख दिलीप मुप्पीडवार, मुख्याध्यापिका अरुणा लांजेकर उपस्थित हाेते.