नक्षलवाद्यांचा कठोर विरोध करा
By Admin | Updated: September 11, 2015 01:43 IST2015-09-11T01:43:05+5:302015-09-11T01:43:05+5:30
शासनाने आदिवासी नागरिकांच्या कल्याणासाठी अनेक योजना कार्यान्वित केल्या आहेत.

नक्षलवाद्यांचा कठोर विरोध करा
प्रणय अशोक यांचे आवाहन : दुर्गम गावात पार पडला जनजागरण मेळावा
भामरागड : शासनाने आदिवासी नागरिकांच्या कल्याणासाठी अनेक योजना कार्यान्वित केल्या आहेत. मात्र लोकशाहीविरोधी तत्त्वांच्या लोकांमुळे सर्वसामान्यांचा विकास रखडला आहे. तसेच शासकीय विकास कामेही प्रभावीत होत आहे. विकासात बाधा निर्माण करणाऱ्या नक्षलवाद्यांचा कठोर विरोध करा, असे आवाहन अहेरीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रणय अशोक यांनी केले.
उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय भामरागडच्या वतीने भामरागड तालुक्यातील कुमरगुडा येथे बुधवारी घेण्यात आलेल्या जनजागरण मेळाव्यात उद्घाटक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भामरागडचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत होते. प्रमुख अतिथी म्हणून भामरागडचे ठाणेदार नाईकवाड, आदिवासी सेवक सब्बर मोगल बेग, कृषी अधिकारी राऊत, पशुवैद्यकीय अधिकारी अश्विनी जयराजन, प्रकल्प अधिकारी कार्यालयाचे मेते, राऊत, आलाम, मुडमा, पद्मावार, वंजा दुर्वा आदी मान्यवर उपस्थित होते. या मेळाव्यात कृषी, आरोग्य, आदिवासी, पोलीस व इतर विभागाच्या वतीने स्टॉल लावून शासकीय योजनांची जनजागृती करण्यात आली. संचालन संतोष मंथनवार यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)