देसाईगंज शहरात वीकेंड लाॅकडाऊनला हरताळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:23 IST2021-07-05T04:23:25+5:302021-07-05T04:23:25+5:30
वीकेंड लाॅकडाऊनच्या नियमांची प्रभावी अंमलबजावणी केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून नियमावली जारी करण्यात ...

देसाईगंज शहरात वीकेंड लाॅकडाऊनला हरताळ
वीकेंड लाॅकडाऊनच्या नियमांची प्रभावी अंमलबजावणी केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून नियमावली जारी करण्यात आली आहे. याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी स्थानिक आपत्ती व्यवस्थापन समिती व नगर प्रशासनाची आहे. दुपारी चार वाजेपर्यंतच दुकाने सुरू ठेवायची आहेत. मात्र चार वाजल्यानंतरही अनेक प्रतिष्ठाने सर्रास सुरू ठेवण्यात येत आहेत. एकीकडे विनामास्क आढळून आल्यास गोरगरिबांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे; तर दुसरीकडे प्रतिष्ठाने उशिरा सायंकाळपर्यंत नियमांना बगल देऊन गर्दीच्या गराड्यात सुरू आहेत. संबंधित प्रतिष्ठानांवर कुठलीच कारवाई करण्यात येत नसल्याने याबाबत खेद आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. अत्यावश्यक सेवेतीलच दुकाने शनिवारी व रविवारी सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र अत्यावश्यक सेवेत न माेडणारीही दुकाने शनिवारी व रविवारी सुरू हाेती. या दुकानांवर कारवाई करण्याची गरज आहे.