एसटी कर्मचारी १७ पासून संपावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 00:08 IST2017-10-13T00:07:40+5:302017-10-13T00:08:02+5:30
एसटी कर्मचाºयांना वेतनवाढ देण्यात यावी, या मुख्य मागणीसह इतर मागण्यांसाठी एसटी कर्मचारी १७ आॅक्टोबरपासून संपावर जात आहेत. एसटी कर्मचाºयांच्या मागण्यांसाठी पाठपुरावा करून संपाला पाठिंबा द्यावा,.....

एसटी कर्मचारी १७ पासून संपावर
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : एसटी कर्मचाºयांना वेतनवाढ देण्यात यावी, या मुख्य मागणीसह इतर मागण्यांसाठी एसटी कर्मचारी १७ आॅक्टोबरपासून संपावर जात आहेत. एसटी कर्मचाºयांच्या मागण्यांसाठी पाठपुरावा करून संपाला पाठिंबा द्यावा, अशी मागणी महाराष्टÑ राज्य एसटी वर्कर काँग्रेसचे (इंटक) विभागीय अध्यक्ष तथा माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
निवेदन देतेवेळी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष लक्ष्मीकांत चौधरी, राजू चौधरी, विलास भुरसे, राजू आखाडे, राजू कुरणकर, अशोक लेभाडे, मिथून भगत यांच्यासह संघर्ष कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. इतर कर्मचाºयांप्रमाणे एसटी कर्मचाºयांनाही सातवा वेतन आयोग लागू करावा, शासनाकडे जमा केलेल्या सात टक्के डीए देण्यात यावा या मागण्यांसाठी आंदोलन केले जाणार आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, या आंदोलनाला काँग्रेस पक्षाने पाठिंबा देऊन मागण्यांसाठी पाठपुरावा करण्याचे आवाहन केले.