निमनवाडा परिसरातील वीजपुरवठा सुरळीत करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:42 IST2021-08-20T04:42:44+5:302021-08-20T04:42:44+5:30
निमगाव बोरी, मासरगाटा या तीन गावातील वीजपुरवठा मागील तीन महिन्यांपासून रात्रंदिवस वारंवार खंडित होत आहे. याबाबत अनेकदा संबंधित लाईनमन ...

निमनवाडा परिसरातील वीजपुरवठा सुरळीत करा
निमगाव बोरी, मासरगाटा या तीन गावातील वीजपुरवठा मागील तीन महिन्यांपासून रात्रंदिवस वारंवार खंडित होत आहे. याबाबत अनेकदा संबंधित लाईनमन व अभियंता यांना तोंडी सांगण्यात आले; परंतु वीजपुरवठा सुरळीत केला नाही. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे डासांची पैदास वाढली आहे. तसेच दमट वातावरणामुळे उकाडा वाढला आहे. शेतीचा हंगाम सुरू असून पाऊस न आल्यास शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी विजेची आवश्यकता असते. त्यामुळे परिसरातील वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. निवेदन देताना शिवसेना तालुकाप्रमुख शेखर उईके, तुळशीदास कुकुडकर, आनंदराव वरखडे, लालाजी नगराळे, भगवान खोब्रागडे, महेश मडावी, मुकेश बोडगेवार, वीरेंद्र गावतुरे, नकुल बोरीकर, जितेश गुरनुले, सुनील दर्राे आदी उपस्थित होते.
180821\2156img-20210818-wa0037.jpg
निमनवादा येथील ग्रामस्थ निवेदन देताना