ग्रामीण भागात पक्ष संघटन मजबूत करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:42 IST2021-08-20T04:42:31+5:302021-08-20T04:42:31+5:30
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून गडचिराेली येथे रविवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी ते बाेलत हाेते. बैठकीला जिल्हाध्यक्ष राज बन्सोड ...

ग्रामीण भागात पक्ष संघटन मजबूत करा
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून गडचिराेली येथे रविवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी ते बाेलत हाेते.
बैठकीला जिल्हाध्यक्ष राज बन्सोड उपस्थित होते. बीआरएसपी विदर्भ अध्यक्ष विशेष फुटाणे यांची गडचिरोली जिल्ह्याच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी त्यांनी बैठक घेतली. २३ ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय कार्यकर्ता व समर्थक संमेलन आयोजित करण्यात आले आहे. कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे, असे आवाहन जिल्ह्याध्यक्ष राज बन्सोड यांनी याप्रसंगी केले. बैठकीला जिल्हा महासचिव पुरुषोत्तम रामटेके, कोषाध्यक्ष मिलिंद बांबोळे, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष महेश टिपले, आदिवासी विकास आघाडी जिल्हाध्यक्ष विनोद मडावी, तालुकाध्यक्ष दीपक बोलीवार, प्रतीक डांगे, जितेंद्र बांबोळे, विजय देवतळे, राज सुखदेवे, पीयूष वाकडे, ताराम आदी कार्यकर्ते उपस्थित होते.