पवारांच्या विचारातून पक्ष संघटन मजबूत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:24 IST2021-06-19T04:24:32+5:302021-06-19T04:24:32+5:30

मुलचेरा : शरद पवार यांच्या विचारातून राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन मजबूत करा, असे आवाहन माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार धर्मरावबाबा ...

Strengthen the party organization with Pawar's thoughts | पवारांच्या विचारातून पक्ष संघटन मजबूत करा

पवारांच्या विचारातून पक्ष संघटन मजबूत करा

मुलचेरा : शरद पवार यांच्या विचारातून राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन मजबूत करा, असे आवाहन माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी केले. १६ जून रोजी मुलचेरा तहसील कार्यालयाच्या सभागृहात विविध विभागांचा आढावा बैठक घेऊन त्यांनी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचीही बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते.

बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष शाहीन हकीम, बबलू हकीम, जिल्हा उपाध्यक्ष योगेश नांदगाये, कार्यकारी अध्यक्ष कपिल बडगे, जिल्हा परिषद बांधकाम सभापती युधिष्टीर बिश्वास, महिला तालुका अध्यक्ष ममता बिश्वास, तालुका कार्यकारी अध्यक्ष मनोज बंडावार, पंचायत समिती उपसभापती प्रगती बंडावार, रायुकाँचे तालुका अध्यक्ष देवा चौधरी, माजी नगरसेवक उमेश पेळूकर, विष्णू रॉय, रंजित स्वर्णकार, बबलू शील आदी उपस्थित होते.

यावेळी आमदार आत्राम यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य देण्याचे आवाहन उपस्थित पदाधिकाऱ्यांना केले. पक्ष संघटनेसाठी दिवसातून केवळ २ तास द्या. मुलचेरा तालुक्यात बुथ कमिटी तयार करण्यावर भर द्या, असे आवाहन जिल्हाध्यक्ष वासेकर केले. भाग्यश्री आत्राम आणि शाहीन हकीम यांनी महिलांना मार्गदर्शन केले.

Web Title: Strengthen the party organization with Pawar's thoughts