पक्ष संघटन मजबूत करा - अशोक नेते
By Admin | Updated: February 3, 2016 01:32 IST2016-02-03T01:32:51+5:302016-02-03T01:32:51+5:30
भाजपप्रणीत केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न व्हावे,

पक्ष संघटन मजबूत करा - अशोक नेते
तालुकाध्यक्षांची आढावा बैठक
गडचिरोली : भाजपप्रणीत केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न व्हावे, लोकहिताचे उपक्रम राबवून गावागावात भाजपचे संघटन मजबूत करा, असे आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा खासदार अशोक नेते यांनी केले.
भाजपच्या नवनिर्वाचित तालुकाध्यक्षांची आढावा बैठक सोमवारी येथील सर्कीट हाऊसमध्ये घेण्यात आली. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी बैठकीला भाजपचे ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे, प्रदेश सदस्य प्रमोद पिपरे, जिल्हा महामंत्री रामेश्वर सेलुकर, जिल्हा सचिव भारत खटी आदी उपस्थित होते. याप्रसंगी जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात पक्षाच्या वतीने विविध उपक्रम राबवून पक्ष संघटन मजबूत करण्याबाबत चर्चा करण्यात आली. बैठकीला गडचिरोली तालुकाध्यक्ष विलास भांडेकर, चामोर्शी तालुकाध्यक्ष दिलीप चलाख, प्रकाश दत्ता, रवी नेलकुंद्री, दिलीप उईके, नवीन बाला, कलाम हुसैन, साईनाथ साळवे, नंदू पेटेवार, राजू जेठानी, रामभाऊ लांजेवार आदी पदाधिकारी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)