काँग्रेसचे संघटन गावागावांत बळकट करा
By Admin | Updated: March 8, 2016 01:24 IST2016-03-08T01:24:30+5:302016-03-08T01:24:30+5:30
काँग्रेस हा सर्वसामान्य लोकांना न्याय देणारा पक्ष असून या पक्षाशी अनेक लोक जुळले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात

काँग्रेसचे संघटन गावागावांत बळकट करा
गडचिरोली : काँग्रेस हा सर्वसामान्य लोकांना न्याय देणारा पक्ष असून या पक्षाशी अनेक लोक जुळले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात युवक काँग्रेसचे संघटन मजबूत करण्यासाठी गावागावात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची फळी बळकट करा, असे आवाहन गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे प्रभारी तथा महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव कुणाल राऊत यांनी केले.
सोमवारी येथील जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात युवक काँग्रेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. यावेळी मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. मंचावर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव निरज लोणारे, धिरज पांडे आदी उपस्थित होते. यावेळी कुणाल राऊत यांनी गडचिरोली जिल्ह्यात युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या लवकरच करण्यात येणार असल्याचे सांगितले.
बैठकीचे प्रास्ताविक लोकसभा क्षेत्राचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, संचालन दलित सेलचे अध्यक्ष रजनिकांत मोटघरे यांनी केले तर आभार युकाँचे गडचिरोली अध्यक्ष अमोल भडांगे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कुणाल पेंदोरकर, अमिता मडावी, कमलेश खोब्रागडे, बालू मडावी, मिलिंद किरंगे, गणेश कुळमेथे, मिलिंद खोब्रागडे, प्रशांत कोराम, योगेश नैताम, एजाज शेख, प्रतिक बारसिंगे, राकेश गणवीर, भुषण भैसारे, अमर नवघडे, विनोद दुधबळे, अभिजीत धाईत, इरफान पठाण, वृषभ धुर्वे, तुषार कुळमेथे आदीसह युकाँच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. (स्थानिक प्रतिनिधी)