संघटनात्मक बांधणीतून बुथ मजबूत करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:40 IST2021-09-26T04:40:24+5:302021-09-26T04:40:24+5:30
२४ सप्टेंबर रोजी गडचिरोलीतील इंदिरा गांधी चौकातील रेस्ट हाऊस येथे आढावा बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत ...

संघटनात्मक बांधणीतून बुथ मजबूत करा
२४ सप्टेंबर रोजी गडचिरोलीतील इंदिरा गांधी चौकातील रेस्ट हाऊस येथे आढावा बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून राज्य कार्यकारिणीचे सदस्य कुशल मेश्राम, पूर्व विदर्भ संयोजन समितीचे समन्वयक मुरलीधर मेश्राम, विवेक हाडके, प्रफुल मानके, अरविंद सांदेकर, राजेंद्र दरवाडे, प्रा. हंसराज बडोले, संजय मोटघरे, जिल्हा अध्यक्ष दुर्योधन तरारे आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हा, तालुका, शहर कार्यकारिणीचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना संघटन बांधणीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. बैठकीचे प्रास्ताविक जिल्हा अध्यक्ष दुर्योधन तरारे यांनी, संचालन जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र बांबोळे यांनी केले तर आभार कोषाध्यक्ष गजानन बारसिंगे यांनी मानले. यावेळी उपाध्यक्ष अक्षमलाल शिडाम, महासचिव रत्नघोष नान्होरीकर, महासचिव केशव सामृतवार, महासचिव कैलाश फुलझेले, संघटक जगन्नाथ बनसोड, विनोद अजबले, पुरुषोत्तम बांबोळे, तालुका अध्यक्ष मंगलदास चापले, योगीराज टेभूर्णे, दुशांत वाटगुरे, विनोद मेश्राम, नितेश अंबादे, महिला आघाडीच्या माजी अध्यक्ष माला भजगवळी, लताताई सहारे व कार्यकर्ते उपस्थित होते.