ईव्हीएम मशीनचा वापर बंद करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 00:45 IST2018-02-08T00:45:15+5:302018-02-08T00:45:32+5:30
निवडणुकीदरम्यान ईव्हीएम मशीनचा वापर बंद करावा, या मुख्य मागणीसाठी बहुजन रिपब्लिकन पार्टीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

ईव्हीएम मशीनचा वापर बंद करा
ऑनलाईन लोकमत
गडचिरोली : निवडणुकीदरम्यान ईव्हीएम मशीनचा वापर बंद करावा, या मुख्य मागणीसाठी बहुजन रिपब्लिकन पार्टीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
ईव्हीएम मशीनचा वापर फारसा सुरक्षित नसल्याने अनेक देशांनी या मशीनच्या वापरावर बंदी घातली आहे. भारतात मात्र या मशीनचा वापर केला जात आहे. भारतातही या मशीनमधील घोळ अनेकवेळा उघडकीस आला आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने निवडणुकीदरम्यान ईव्हीएम मशीनचा वापर करू नये, या मुख्य मागणीसाठी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी तर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान संजय मगर, विलास कोडापे, डॉ. कैलाश नगराळे, राज बन्सोड, पुरूषोत्तम रामटेके, मोहन मोटघरे, क्षिरसागर शेंडे, सचिन गेडाम, जनार्धन सहारे, श्रीधर भगत, लक्ष्मण नागदेवते यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी मिलींद बांबोळे, सदाशिव निमगडे, देवा वनकर, प्रतिक डांगे, विजय देवतळे, घनश्याम खोब्रागडे, जितेंद्र बांबोळे, रितेश अंबादे, सचिन निमगडे, ईश्वर मेश्राम, केशराज मेश्राम, प्रफुल्ल रॉय, विनोद मडावी, शेषराव गावडे, सूरज कोवे, अजय नैताम, धनंजय बांबोळे, त्र्येंबक घडले आदी उपस्थित होते. मागण्यांचे निवेदन राष्टÑपती, मुख्य निवडणूक आयुक्त यांना पाठविण्यात आले.