युवक काँग्रेसतर्फे रस्ता रोखो
By Admin | Updated: June 11, 2016 01:21 IST2016-06-11T01:21:55+5:302016-06-11T01:21:55+5:30
वाढलेली महागाई व केंद्र शासनाने निवडणुकीदरम्यान सामान्य जनतेला दिलेले आश्वासन पूर्ण झाले...

युवक काँग्रेसतर्फे रस्ता रोखो
आरमोरी व गडचिरोलीत आंदोलन : महागाई विरोधात दिली निदर्शने
गडचिरोली/आरमोरी : वाढलेली महागाई व केंद्र शासनाने निवडणुकीदरम्यान सामान्य जनतेला दिलेले आश्वासन पूर्ण झाले नसल्याच्या निषेधार्थ युवक काँग्रेसतर्फे आरमोरी व गडचिरोली येथे धरणे आंदोलन तसेच रस्ता रोखो आंदोलन शुक्रवारी करण्यात आले.
गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात दुपारी १२ वाजताच्या सुमारास काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी केंद्र शासनाच्या विरोधात निदर्शने केली. सातत्याने पेट्रोल, डिझेल, गॅस यांच्या किमतीत सातत्याने वाढ केली जात असल्याने जनता त्रस्त झाली असल्याचा आरोप करीत निदर्शने केली. या आंदोलनाचे नेतृत्व काँग्रेस जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव हरीक्रिष्णा उजाला, महिला जिल्हाध्यक्ष भावना वानखेडे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, हसनअली गिलानी, पंकज गुड्डेवार, सतीश विधाते, काशिनाथ भडके, पांडुरंग घोटेकर, नरेंद्र भरडकर, लता पेदापल्ली, नितेश राठोड, जीवन कुत्तरमारे, पं.स. सदस्या अमिता मडावी, रजनिकांत मोटघरे, अमोल भडांगे यांनी केले.
आरमोरी - येथील भगतसिंग चौकात तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष किशोर वनमाळी, माजी आमदार आनंदराव गेडाम यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर काही काळ रस्ता रोखो सुध्दा करण्यात आला. आंदोलनात आनंदराव आकरे, रामभाऊ हस्तक, बग्गुजी ताडाम, युवक काँग्रेसचे विधानसभा प्रमुख मिलिंद खोब्रागडे, पं.स. सदस्य इंदिरा मोहुले, महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष मंगला कोवे, वघाळाच्या सरपंचा मनिषा दोनाडकर, श्रीनिवास आंबटवार, दत्तू सोमनकर, दिलीप घोडाम, नामदेव सोरते, प्रभाकर टेंभुणे, चंदू वडपल्लीवार, नरेश टेंभुर्णे, भुपेश कोलते, सुभाष सपाटे, अनिल सोमनकर, जितेंद्र रामटेते, यज्ञकला ठवरे, बेबी सोरते, देविदास उंदीरवाडे, वृंदा गजभिये, विलास हारगुळे, दीपक दुपारे, यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)