सुदृढ व आरोग्यदायी राहून हृदयविकाराला ठेवा दूर
By Admin | Updated: September 24, 2015 01:57 IST2015-09-24T01:57:55+5:302015-09-24T01:57:55+5:30
आयुष्यात व्यक्तीला विविध आजारांना बळी पडावे लागते. काही आजार संसर्गजन्य असतात तर काही आजार व्यक्ती स्वत: त्याच्या स्वभाव गुणधर्मानुसार तसेच सवयीनुसार,...

सुदृढ व आरोग्यदायी राहून हृदयविकाराला ठेवा दूर
हृदयविकार जागरूकता दिन : १५ टक्के लोकसंख्या आजारग्रस्त
गडचिरोली : आयुष्यात व्यक्तीला विविध आजारांना बळी पडावे लागते. काही आजार संसर्गजन्य असतात तर काही आजार व्यक्ती स्वत: त्याच्या स्वभाव गुणधर्मानुसार तसेच सवयीनुसार, व्यसनानुसार ओढवून घेत असतो. विविध आजारांपैकी हृदयरोगही यापैकीच एक आजार आहे. जो व्यक्तीला त्याच्या खानपान, सवयी, मानसिक संतुलन यानुसार जडत असतो. एकूण लोकसंख्येच्या १० ते १५ टक्के लोकांना हृदयविकार आजार जडत असतो. मात्र या आजारावर योग्य नियंत्रण ठेवण्याकरिता उपाययोजना केल्यास आजाराला दूर ठेवता येते.
हृदयविकार आजार लहान मुलांना जन्मताच झाल्यास आजारावर उपचार म्हणून शस्त्रक्रियेशिवाय पयार्य नसतो. तसेच वयाच्या २५ वर्षानंतर हृदयविकार झाल्यास विविध औषधांचे सेवन केल्यास आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. मानसिक ताणतणाव, धूम्रपान, कोलेस्ट्रॉल वाढल्याने हृदयविकार होऊ शकतो. त्यामुळे व्यक्तीने याबाबीपासून दूर राहावे. वयाच्या २५ वर्षानंतर होणाऱ्या हृदयविकाराचे प्रमाण नागरिकांमध्ये १० ते १५ टक्के असते. तसेच जन्मत: लहान मुलांना आजार होण्याचे प्रमाण १ ते २ टक्के असते. विशेषत: हृदयविकार वयाच्या २५ वर्षानंतर सार्वधिक प्रमाणात होत असल्याचे रूग्णांच्या संख्येवरून दिसून येत आहे. गडचिरोली जिल्ह्यातही एकूण लोकसंख्येच्या तुलनेत १० ते १५ टक्के लोकसंख्या हृदयविकाराने ग्रस्त आहे.