विकासकामात अवरोध निर्माण करणाऱ्या प्रवृत्तीपासून अलिप्त राहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:24 IST2021-06-21T04:24:00+5:302021-06-21T04:24:00+5:30

कुरखेडा : पोलीस हा जनतेचाच एक घटक आहे. तो सामान्य जनतेचा हक्क व अधिकार अबाधित राखण्याकरीता लढत आहे. कायदा ...

Stay away from tendencies that create obstacles in development work | विकासकामात अवरोध निर्माण करणाऱ्या प्रवृत्तीपासून अलिप्त राहा

विकासकामात अवरोध निर्माण करणाऱ्या प्रवृत्तीपासून अलिप्त राहा

कुरखेडा : पोलीस हा जनतेचाच एक घटक आहे. तो सामान्य जनतेचा हक्क व अधिकार अबाधित राखण्याकरीता लढत आहे. कायदा व सुव्यवस्था राखणे एवढ्यापुरतेच स्वत:ला मर्यादित न ठेवता सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून जिल्हा पोलीस विविध उपक्रम राबवित आहे. पोलिसांच्या या उपक्रमाचा लाभ घेत सहकार्य करा व विकासकामात अवरोध निर्माण करणाऱ्या प्रवृत्तीपासून अलिप्त राहा, असे आवाहन कुरखेडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुधाकर देडे यानी केले.

कुरखेडा पोलीस स्टेशन येथे नागरी कृती कार्यक्रमाअंतर्गत रविवारला आयोजित महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जाॅब कार्ड वितरण करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. याप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे, देवराव भांडेकर, महिला पोलीस उपनिरीक्षक शीतल माने, हवालदार उमेश नेवारे, मीनाक्षी तोडासे, बळीराम पदा, विलास शेडमाके, मनोहर पूराम, ललित जांभूळकर, बाबूराव उराडे, गौरीशंकर भैसारे, रूपेश काळबांधे, प्रफुल बेहरे, रूषमा टेकाम, भगवान तलांडे तसेच गावागावातून आलेले पोलीस पाटील व लाभार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमात पोलीस विभागाच्या पुढाकाराने ८० मजुरांचे जाॅब कार्ड बनवून देण्यात आले. त्याचे वितरण यावेळी करण्यात आले. तसेच यावेळी पंचायत समितीचे समन्वयक मृणाल माकडे यानी शासनाची ‘आयूष्यमान भारत’ या आरोग्यदायी योजनेच्या माहिती पुस्तिका वाटप करण्यात आल्या. संचालन पोलीस पाटील प्रेम पंधरे, प्रास्ताविक शीतल माने यांनी केले तर आभार पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे यानी मानले.

===Photopath===

200621\img_20210620_144148.jpg~200621\img_20210620_144027.jpg

===Caption===

मार्गदर्शन करताना ठाणेदार सूधाकर देडे~मजूराना जाब कार्ड चे वितरण करताना ठाणेदार सूधाकर देडे व मान्यवर

Web Title: Stay away from tendencies that create obstacles in development work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.