एसटी कर्मचाºयांचे निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 23:52 IST2017-10-15T23:52:31+5:302017-10-15T23:52:42+5:30
१६ आॅक्टोबरच्या मध्यरात्रीपासून एसटी कर्मचारी संपावर जाणार आहेत.

एसटी कर्मचाºयांचे निवेदन
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : १६ आॅक्टोबरच्या मध्यरात्रीपासून एसटी कर्मचारी संपावर जाणार आहेत. याबाबतचे निवेदन महाराष्टÑ एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) च्या वतीने गडचिरोली विभाग नियंत्रक व्ही.टी. गवाळे यांना दिले आहे.
वेतनवाढ करण्यात यावी, या मुख्य मागणीसाठी राज्यभरातील एसटीचे कर्मचारी संपावर जाणार आहेत. याबाबतची पूर्वकल्पना देण्यासाठी संघटनेचे उपाध्यक्ष लक्ष्मीकांत चौधरी यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. निवेदन देतेवेळी फाये, कामडी, दीक्षित, किशोर लिंगलवार, नवीन बंडवाल, समशेर कुंभारे, बाबर उपस्थित होते.
ऐन दिवाळीच्या कालावधीत एसटी कर्मचारी संपावर जाणार असल्याने एसटीचे फारमोठे नुकसान होणार आहे. त्याचबरोबर प्रवाशांचेही हाल होणार आहे. यावर राज्य शासन कोणता तोडगा काढते, यावर लक्ष लागून आहे. संघटनेचे पदाधिकारी व राज्य सरकारमध्ये वाटाघाटी सुरू आहेत. संप मिटविण्यासाठी राज्य शासनाकडून शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतनात वाढ न झाल्यास संप करण्याचा इशारा संघटनांनी दिला आहे.