शहरी भागात रोहयोची कामे सुरू करा

By Admin | Updated: March 3, 2016 01:30 IST2016-03-03T01:30:41+5:302016-03-03T01:30:41+5:30

शेतीचा हंगाम संपला असल्याने शेतकरी, शेतमजुरांना रोजगाराची अत्यंत आवश्यकता आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी प्रत्येक नागरिकाच्या हाताला काम मिळेल, ....

Start the work in urban areas | शहरी भागात रोहयोची कामे सुरू करा

शहरी भागात रोहयोची कामे सुरू करा

आमदारांचे निर्देश : आरमोरी तहसील कार्यालयात बैठक
आरमोरी : शेतीचा हंगाम संपला असल्याने शेतकरी, शेतमजुरांना रोजगाराची अत्यंत आवश्यकता आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी प्रत्येक नागरिकाच्या हाताला काम मिळेल, यानुसार नियोजन करावे, असे निर्देश आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आ. क्रिष्णा गजबे यांनी केले.
येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात १ मार्च रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. बैठकीला तहसीलदार वलथरे, नायब तहसीलदार चन्नावार, नायब तहसीलदार नैताम, तालुका कृषी अधिकारी कटरे, वनपरिक्षेत्राधिकारी तांबटकर, भाजपाचे तालुकाध्यक्ष नंदू पेट्टेवार, पंकज खरवडे, महेंद्र शेंडे, वेणूताई ढवगाये, राजू कंटकवार आदी उपस्थित होते.
यावेळी आ. क्रिष्णा गजबे यांनी विविध विभागांच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या रोजगार हमी योजनेच्या कामांचा आढावा घेतला. नगर पंचायत क्षेत्रातील नागरिकांना काम उपलब्ध करून देता येईल, यासाठी वरिष्ठ स्तरावर अधिकाऱ्यांनी पाठपुरावा करावा, मजुरांनी मागणी करताच कामे मिळावे, यासाठी अतिरिक्त नियोजन करून सदर कामे मंजूर करून घ्यावीत, असे निर्देश आ. गजबे यांनी दिले. (प्रतिनिधी)

Web Title: Start the work in urban areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.