कौशल्य विकास प्रशिक्षण सुरू करा
By Admin | Updated: August 3, 2016 02:06 IST2016-08-03T02:06:43+5:302016-08-03T02:06:43+5:30
केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाने जम्मू-कश्मिर राज्याच्या दहशत प्रभावित क्षेत्रात युवकांसाठी रोजगाराची संधी...

कौशल्य विकास प्रशिक्षण सुरू करा
लोकसभेत मुद्दा उपस्थित : अशोक नेते यांची मागणी
गडचिरोली : केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाने जम्मू-कश्मिर राज्याच्या दहशत प्रभावित क्षेत्रात युवकांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण सुरू केले. याच धर्तीवर नक्षल प्रभावित गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात युवकांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण सुरू करावे, अशी मागणी खा. अशोक नेते यांनी मंगळवारी नियम ३७७ सूचनेअंतर्गत लोकसभेत केली.
यावेळी सदर मुद्दा मांडताना खा. नेते लोकसभेत म्हणाले, गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्र हा नक्षलग्रस्त भाग आहे. या क्षेत्रात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे येथील युवकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कौशल्य विकासावर आधारित प्रशिक्षण देण्याची गरज आहे. केंद्र शासनाने सदर उपक्रम सुरू केल्यास मोठ्या प्रमाणात या लोकसभा क्षेत्राची बेरोजगारी कमी होईल. त्यामुळे यासंदर्भात केंद्र शासनाने तत्काळ निर्णय घ्यावा, असे खा. नेते म्हणाले. कौशल्य विकास प्रशिक्षणच्या मुद्यावर सखोल चर्चा झाली. (प्रतिनिधी)