ग्रामगीता वाचन सप्ताह सुरू
By Admin | Updated: November 20, 2015 01:54 IST2015-11-20T01:54:36+5:302015-11-20T01:54:36+5:30
स्व. तुळसाबाई किसनजी दशमुखे स्मृती भवन व शिव मंदिर पोर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने कार्तिक पौर्णिमेच्या ...

ग्रामगीता वाचन सप्ताह सुरू
पोर्ला येथे कार्यक्रम : सामुदायिक प्रार्थना, रामधून, धार्मिकविधी
गडचिरोली : स्व. तुळसाबाई किसनजी दशमुखे स्मृती भवन व शिव मंदिर पोर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने कार्तिक पौर्णिमेच्या पर्वावर वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेचे ज्ञान सर्वसामान्यांना व्हावे या उद्देशाने ग्रामगीता वाचन सप्ताह गुरूवारपासून सुरू करण्यात आला आहे.
डोमाजी झरकर महाराज यांच्या हस्ते सप्ताहाची सुरूवात पोर्ला येथे करण्यात आली. तत्पूर्वी सकाळी शिव मंदिरात पहाटे सामुदायिक प्रार्थना, रामधून व डोमाजी झरकर महाराज यांच्या ग्रामगीता वाचनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी केशवराव दशमुखे, सिंधूबाई दशमुखे, प्रमोद दशमुखे, कांचन दशमुखे, संतोष दशमुखे, योगिता दशमुखे, पांडुरंग सूर्यवंशी, जीजाबाई खरवडे, सोमेश्वर भरणे महाराज, रामदास अम्मावार, शेषराव साळवे व बहुसंख्य भाविक उपस्थित होते. ग्रामगीता वाचन सप्ताह २५ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. या सप्ताहात होणाऱ्या विविध धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केशवराव दशमुखे यांनी केले आहे. (शहर प्रतिनिधी)