गडचिरोली-गिलगाव-पोटेगाव‌ बस सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:34 IST2021-03-28T04:34:52+5:302021-03-28T04:34:52+5:30

चामाेर्शी तालुक्यातील कुनघाडा(रै.) ईरइ, काशिपूर, अंकोला, बांधोना, नवरगाव, गट्टेगुळा, गिलगाव, भेंडीकन्हार, थाटरी, बेनोली, पोटेगाव परिसरातील नागरिकांना जिल्हा मुख्यालयात जाण्यासाठी ...

Start Gadchiroli-Gilgaon-Potegaon bus | गडचिरोली-गिलगाव-पोटेगाव‌ बस सुरू करा

गडचिरोली-गिलगाव-पोटेगाव‌ बस सुरू करा

चामाेर्शी तालुक्यातील कुनघाडा(रै.) ईरइ, काशिपूर, अंकोला, बांधोना, नवरगाव, गट्टेगुळा, गिलगाव, भेंडीकन्हार, थाटरी, बेनोली, पोटेगाव परिसरातील नागरिकांना जिल्हा मुख्यालयात जाण्यासाठी गिलगाव‌ ज.- पोटेगाव बसफेरी सुरू करण्यात आली होती. मात्र मागील वर्षांपासून कोरोना संसर्गामुळे बसफेरी बंद करण्यात आली. कुनघाडा(रै.) व गिलगाव ज. परिसरात गडचिरोली वरून कोणतीच बसफेरी नसल्याने गिलगाव परिसरातील प्रवाशांना कुनघाडा फाट्यावर येऊन गडचिरोलीकडे जाणारी बस पकडावी लागते. यासाठी त्यांना ७-८ किमीचे अंतर पार करावे लागते. गिलगाव‌ ग्रामपंचायतच्या मासिक सभेत याबाबत ठराव घेण्यात येऊन तो गडचिरोली आगाराकडे पाठविण्यात आला आहे. त्यामुळे या मागणीची दखल घेऊन गडचिरोली- गिलगाव‌-पोटेगाव बसफेरी सुरू करावी, अशी मागणी गिलगावच्या सरपंच रेखा अलाम यांच्यासह उपसरपंच मनोज चापडे, ग्रां.प. सदस्य मोहित अलाम, संध्या मोगरकर, शालू अलाम, नयना कड्याम, शकुंतला तुंकलवार यांनी केली आहे.

Web Title: Start Gadchiroli-Gilgaon-Potegaon bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.