कौशल्य विकासावरील अभ्यासक्रम सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:24 IST2021-06-22T04:24:54+5:302021-06-22T04:24:54+5:30
जिल्ह्यातील युवकांना कौशल्यावर आधारित शिक्षण दिल्यास स्थानिक गुणवत्तेला वाव मिळेल. तसेच जिल्ह्यातील उपलब्ध साधनसंपत्तीचा वापरही करता येईल, असे वडेट्टीवार ...

कौशल्य विकासावरील अभ्यासक्रम सुरू करा
जिल्ह्यातील युवकांना कौशल्यावर आधारित शिक्षण दिल्यास स्थानिक गुणवत्तेला वाव मिळेल. तसेच जिल्ह्यातील उपलब्ध साधनसंपत्तीचा वापरही करता येईल, असे वडेट्टीवार म्हणाले. कौशल्य विकासाच्या अभ्यासक्रमावरील प्रस्ताव मंजुरीसाठी मंत्रालयस्तरावर एक दिवसाच्या बैठकीचे आयोजन करू, असेही ते म्हणाले. यात पालकमंत्री, संबंधित मंत्री, सचिव, जिल्हा प्रशासन सहभागी असेल. या बैठकीतून नक्कीच प्रलंबित व नियोजित कौशल्य विकास योजना मार्गी लागतील, असा विश्वास ना. वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.
(बॉक्स)
इंजिनिअरिंग कॉलेजसाठी बोदलीची जागा घ्या
विद्यापीठांतर्गत प्रस्तावित इंजिनिअरिंग कॉलेजसाठी आवश्यक असलेल्या जागेबद्दलही यावेळी चर्चा करण्यात आली. याबाबत विविध प्रस्ताव येत आहेत. यातील बोदली येथील बंद असलेल्या इंजिनिअरिंग कॉलेजचाही विचार करण्यात यावा, असे ना. वडेट्टीवार यांनी सूचित केले.
(बॉक्स)
मान्सूनमधील अचानक येणारे संकट टळेल
जिल्ह्यातील मान्सूनपूर्व तयारीबाबतच्या बैठकीत मनुष्यबळ, साहित्याची उपलब्धता याबाबत चर्चा झाली. गेल्यावर्षीच्या पूरस्थितीचा अनुभव लक्षात घेता, त्या प्रकारच्या आपत्तीवर प्रशासनाने तयारी ठेवावी. गोसीखुर्द किंवा दक्षिणेकडील धरणांबाबत राज्यस्तरावरून त्या-त्या प्रशासनाबरोबर चर्चा करण्यात आली आहे. त्यामुळे अचानक येणारे संकट यावेळी टाळता येईल. मात्र पावसामुळे कोणाला त्रास होऊ नये व आवश्यक मदत वेळेत मिळावी म्हणून सतर्क राहा, अशा सूचना ना. वडेट्टीवार यांनी या बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या.