शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

कोरची तालुक्यात बसफेऱ्या सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2017 01:47 IST

तालुक्यात दळणवळणाची साधने अत्यंत मर्यादित असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी या तालुक्याकडे विशेष लक्ष घालून बसफेऱ्या

तहसीलदारांना निवेदन : सेवा बंद असल्याने प्रवासी व विद्यार्थ्यांची अडचण कोरची : तालुक्यात दळणवळणाची साधने अत्यंत मर्यादित असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी या तालुक्याकडे विशेष लक्ष घालून बसफेऱ्या सुरू करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाला निर्देश द्यावेत, अशी मागणी तहसीलदारांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. कोरची हा गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर वसलेला तालुका आहे. या तालुक्याच्या सीमा छत्तीसगड राज्याला लागून आहेत. त्यामुळे आंतरराज्यीय बसफेऱ्या सुरू होणे आवश्यक आहे. गडचिरोली ते कोरची व राजनांदगाव ही नवीन बसफेरी सुरू करावी, त्याचबरोबर गडचिरोली-कोरची-गोंदिया ही बसफेरी जुनीच आहे. मात्र गडचिरोली आगाराने अचानक सदर फेरी बंद केली. त्यामुळे प्रवाशी व विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. गडचिरोली-कोरची-बोटेकसा-बेतकाठी-बोरी-कोटगूल- गडचिरोली-कोरची-कोटरा-कोकोडी, कोचीनारा-कोरची-दवंडी-बेलगाव ही बसफेरी सुरू करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. सदर निवेदनावर कोरची नगर पंचायतीचे नगरसेवक तथा काँग्रेस तालुकाध्यक्ष श्यामलाल मडावी, उपाध्यक्ष मनोज अग्रवाल, जि.प. सदस्य अनिल केरामी, नगरसेवक मेघश्याम जमकातन, नगरसेविका हर्षलता भैसारे, बिहिटेकला ग्रामपंचायतीचे उपसरपंच जगदिश कपूरडेहरिया,, बेतकाठीचे उपसरपंच हकीमुद्दीन शेख, सदरूद्दिन भामानी, माजी जि.प. सदस्य प्रमिला काटेंगे, कोरची पंचायत समितीचे माजी उपसभापती हेमलता शेंडे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राहूल अंबादे, धनराज मडावी, विठ्ठल शेंडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. (शहर प्रतिनिधी)