कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात २०० बेडचे कोविड सेंटर सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:33 IST2021-04-19T04:33:34+5:302021-04-19T04:33:34+5:30
कुरखेडा : स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात २०० बेडचे व प्रत्येक रुग्णालयात १०० बेडचे कोविड सेंटर सुरू करा, अशी मागणी ...

कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात २०० बेडचे कोविड सेंटर सुरू करा
कुरखेडा : स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात २०० बेडचे व प्रत्येक रुग्णालयात १०० बेडचे कोविड सेंटर सुरू करा, अशी मागणी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिह चंदेल यांनी केली आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग व आढळून येत असलेले संशयित रुग्ण व बाधित रुग्णांमुळे जिल्हा सामान्य रुग्णालय फुल्ल झाले आहे. रूग्णांना बेडसाठी रुग्णालयात काही वेळ वाट बघावी लागते. काहीना जास्त संसर्ग झाल्याने ते मृत्यूमुखी पडत आहेत. रुग्ण जास्त व डॉक्टरांची संख्या कमी पडत आहे. प्रत्येक तहसील स्तरावर प्राथमिक उपचार व गंभीर रुग्णांचे उपचार सुरू केल्यास प्रत्येक रुग्णाला बेडही मिळेल व उपचारही चांगल्या पद्धतीने होतील. त्यामुळे प्रत्येक तालुक्यातील शासकीय रुग्णालयात १०० बेडचे आणि प्रत्येक उपजिल्हा रूग्णालयात २०० बेडचे कोविड सेंटर तत्काळ सुरू करावे, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री एकनाथ शिंदे, जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे सुरेंद्रसिह चंदेल यांनी केली आहे.