देसाईगंजात १०० बेडचे काेविड केअर सेंटर सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:38 IST2021-04-22T04:38:01+5:302021-04-22T04:38:01+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क गडचिराेली : सध्या काेराेनाचा प्रादुर्भाव प्रचंड वेगाने वाढत आहे. काेराेनाच्या नायनाटासाठी जेवढ्या साेयीसुविधा, औषधी व लस ...

देसाईगंजात १०० बेडचे काेविड केअर सेंटर सुरू करा
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : सध्या काेराेनाचा प्रादुर्भाव प्रचंड वेगाने वाढत आहे. काेराेनाच्या नायनाटासाठी जेवढ्या साेयीसुविधा, औषधी व लस यांची व्यवस्था करण्यात आली, ती ताेकडी पडत असल्याचे दिसते. बाधित रुग्ण व मृतांचा आकडा वाढत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्यामुळे देसाईगंज येथे १०० बेडचे काेविड केअर सेंटर तत्काळ सुरू करावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेसच्या डाॅक्टर सेलचे सरचिटणीस डाॅ. प्रमाेद साळवे व माजी नगराध्यक्ष जेसा माेटवानी यांनी प्रशासनाकडे केली आहे.
देसाईगंज तालुका हा भंडारा व चंद्रपूर जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण आहे. लगतच काेरची, आरमाेरी तालुके आहेत. देसाईगंज, आरमाेरी, काेरची या तीनही तालुक्याची लाेकसंख्या जवळपास अडीच लाख आहे. ही लाेकसंख्या लक्षात घेता कोरोनाबाधितांना तातडीने उपचार मिळण्यासाठी देसाईगंज येथे सुसज्ज आराेग्य सुविधा असणे आवश्यक आहे. त्यामुळे देसाईगंज येथे १०० बेडच्या काेविड केअर सेंटरची नितांत गरज आहे. हे काेविड केअर सेंटर सुरू करण्यासाठी देसाईगंज नगर पालिकेचे माेठे सभागृह साेयीचे होऊ शकते. या ठिकाणी काेविड केअर सेंटर उभारणे सहज शक्य असल्याने त्या दृष्टीने प्रशासनाने हालचाली कराव्यात, असे डाॅ. साळवे आणि माेटवानी यांनी सुचविले आहे.