शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

एसटी कर्मचाऱ्यांचे निर्धार आंदोलन

By admin | Updated: October 14, 2016 01:51 IST

विविध मागण्यांसाठी गडचिरोली आगारातील इंटक संघटनेची संलग्न असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी गुरूवारी सकाळी ११ वाजता गडचिरोली एसटी

इंटक संघटनेचे नेतृत्व : बॅच लावून केले चालक व वाहकांनी कामगडचिरोली : विविध मागण्यांसाठी गडचिरोली आगारातील इंटक संघटनेची संलग्न असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी गुरूवारी सकाळी ११ वाजता गडचिरोली एसटी आगारासमोर निर्धार आंदोलन केले. यादरम्यान काही काळ धरणे दिली. त्यानंतर सर्व कर्मचारी बॅच लावून कर्तव्यावर परतले. एसटी कर्मचाऱ्यांना राज्य कर्मचाऱ्याचा दर्जा देण्यात यावा, राज्य कर्मचाऱ्याला ज्या सोयीसुविधा पुरविण्यात येतात, त्याच सोयीसुविधा एसटी कर्मचाऱ्यांनाही देण्यात याव्या, इतर कर्मचाऱ्यांच्या तुलनेत एसटी कर्मचाऱ्यांना अतिशय कमी वेतन आहे. वेतनात वाढ करावी, बोनस देण्यात यावे, सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन द्यावे, कनिष्ठ श्रेणी रद्द करावी, एसटी कर्मचारी ज्या ठिकाणी काम करते, तेथील कामाची जागा स्वच्छ व सुरक्षित ठेवण्यात यावी, वाहकांची अपहार प्रकरणे तडजोड करून निकाली काढण्याचे परिपत्रक रद्द करावे, चालक-वाहक यांचे ड्यूटी लोकेशन संगणकीकृत करावे, चालक व वाहक तसेच इतर कर्मचाऱ्यांकरिता संगणकीकृत रजा व्यवस्थापन करावे, सर्व यांत्रिक कर्मचाऱ्यांना ग्रेडेशनचा लाभ द्यावा आदी मागण्यांसाठी निर्धार आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनात गडचिरोली आगारातील १५० पेक्षा अधिक एसटी कर्मचारी सहभागी झाले होते. पुढील मोठ्या आंदोलनासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी केलेला हा निर्धार आहे. मागण्या मान्य न झाल्यास भविष्यात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. आंदोलनानंतर कर्मचारी आपापल्या कामावर परतले. आंदोलनाचे नेतृत्व इंटक संघटनेचे विभागीय सचिव लक्ष्मीकांत चौधरी, सुनील खोब्रागडे, राजू आखाडे, विलास भुरसे, किशोर वानखेडे यांनी केले आहे. (नगर प्रतिनिधी)