एसटी कर्मचाऱ्यांचे निर्धार आंदोलन

By Admin | Updated: October 14, 2016 01:51 IST2016-10-14T01:51:05+5:302016-10-14T01:51:05+5:30

विविध मागण्यांसाठी गडचिरोली आगारातील इंटक संघटनेची संलग्न असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी गुरूवारी सकाळी ११ वाजता गडचिरोली एसटी

ST workers' determination agitation | एसटी कर्मचाऱ्यांचे निर्धार आंदोलन

एसटी कर्मचाऱ्यांचे निर्धार आंदोलन

इंटक संघटनेचे नेतृत्व : बॅच लावून केले चालक व वाहकांनी काम
गडचिरोली : विविध मागण्यांसाठी गडचिरोली आगारातील इंटक संघटनेची संलग्न असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी गुरूवारी सकाळी ११ वाजता गडचिरोली एसटी आगारासमोर निर्धार आंदोलन केले. यादरम्यान काही काळ धरणे दिली. त्यानंतर सर्व कर्मचारी बॅच लावून कर्तव्यावर परतले.
एसटी कर्मचाऱ्यांना राज्य कर्मचाऱ्याचा दर्जा देण्यात यावा, राज्य कर्मचाऱ्याला ज्या सोयीसुविधा पुरविण्यात येतात, त्याच सोयीसुविधा एसटी कर्मचाऱ्यांनाही देण्यात याव्या, इतर कर्मचाऱ्यांच्या तुलनेत एसटी कर्मचाऱ्यांना अतिशय कमी वेतन आहे. वेतनात वाढ करावी, बोनस देण्यात यावे, सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन द्यावे, कनिष्ठ श्रेणी रद्द करावी, एसटी कर्मचारी ज्या ठिकाणी काम करते, तेथील कामाची जागा स्वच्छ व सुरक्षित ठेवण्यात यावी, वाहकांची अपहार प्रकरणे तडजोड करून निकाली काढण्याचे परिपत्रक रद्द करावे, चालक-वाहक यांचे ड्यूटी लोकेशन संगणकीकृत करावे, चालक व वाहक तसेच इतर कर्मचाऱ्यांकरिता संगणकीकृत रजा व्यवस्थापन करावे, सर्व यांत्रिक कर्मचाऱ्यांना ग्रेडेशनचा लाभ द्यावा आदी मागण्यांसाठी निर्धार आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनात गडचिरोली आगारातील १५० पेक्षा अधिक एसटी कर्मचारी सहभागी झाले होते. पुढील मोठ्या आंदोलनासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी केलेला हा निर्धार आहे. मागण्या मान्य न झाल्यास भविष्यात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. आंदोलनानंतर कर्मचारी आपापल्या कामावर परतले. आंदोलनाचे नेतृत्व इंटक संघटनेचे विभागीय सचिव लक्ष्मीकांत चौधरी, सुनील खोब्रागडे, राजू आखाडे, विलास भुरसे, किशोर वानखेडे यांनी केले आहे. (नगर प्रतिनिधी)

Web Title: ST workers' determination agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.