एसटीने पुन्हा धरली परराज्याची वाट !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:41 IST2021-09-23T04:41:55+5:302021-09-23T04:41:55+5:30
गडचिराेली : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अहेरी आगारातर्फे अहेरी, सिराेंचा, मंचेरिअल, हैदराबाद ही तेलंगणाकडे जाणारी बसफेरी सुरू करण्यात ...

एसटीने पुन्हा धरली परराज्याची वाट !
गडचिराेली : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अहेरी आगारातर्फे अहेरी, सिराेंचा, मंचेरिअल, हैदराबाद ही तेलंगणाकडे जाणारी बसफेरी सुरू करण्यात आली आहे. या बसफेरीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. गडचिराेली आगाराची एक बसफेरी चंद्रपूर - राजुरामार्गे तेलंगणाकडे जात आहे. मात्र, छत्तीसगड राज्याकडे जाणाऱ्या बसफेरीला आंतरराज्यीय परवानगी नसल्याने छत्तीसगडकडे जाणाऱ्या बसफेऱ्या बंद आहेत. त्यामुळे प्रवासी खासगी वाहनातून जात आहेत.
बाॅक्स ....
परराज्यात जाणाऱ्या बसगाड्या
महामंडळाच्या अहेरी आगारातून अहेरी, सिराेंचा, मंचेरिअल, हैदराबाद ही बसफेरी अनेक दिवसांपासून सुरू आहे. गडचिराेली आगारातून धानाेरा, मानपूर, राजनांदगाव तसेच पाखांजूर ही बस छत्तीसगडकडे साेडली जाते. परवाना नसल्याने छत्तीसगडकडील दाेन्ही बसगाड्या बंद आहेत.
बाॅक्स .....
९० टक्के वाहक - चालकांचे लसीकरण पूर्ण
राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे गडचिराेली विभागीय कार्यालय, गडचिराेली आगार, वर्कशाॅप तसेच सर्व आस्थापना मिळून जवळपास ९५ टक्के कर्मचाऱ्यांचे काेराेना प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण झाले आहे. यामध्ये चालक - वाहकांचाही समावेश आहे. अहेरी आगारात चालक - वाहकांसह ९० टक्के कर्मचाऱ्यांनी काेराेना लसीकरणाचे दाेन्ही डाेस घेतले आहेत, अशी माहिती आगार प्रमुखांनी लाेकमतशी बाेलताना दिली.
काेट ......
गडचिराेली येथील एसटी विभागातील ९५ टक्के वाहक व चालकांचे काेराेना लसीकरण पूर्ण झाले आहे. काेराेनाचे दाेन्ही डाेस घेण्याबाबत काही दिवसांपूर्वी नाेटीस काढण्यात आली हाेती. आमच्या आगारातून चंद्रपूर - राजुरामार्गे तेलंगणाकडे बसफेरी सुरू आहे. परवाना नसल्याने धानाेरा, राजनांदगाव, छत्तीसगडकडे जाणारी बसफेरी बंद आहे.
- प्रदीप सालाेटकर, बसस्थानक प्रमुख, गडचिराेली