एसटी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन
By Admin | Updated: October 15, 2016 01:43 IST2016-10-15T01:43:02+5:302016-10-15T01:43:02+5:30
एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या वतीने गडचिरोली

एसटी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन
गडचिरोली : एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या वतीने गडचिरोली आगारासमोर शुक्रवारी धरणे आंदोलन करण्यात आले.
एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी सरसकट १५ हजार रूपये बोनस देण्यात यावा, १ एप्रिल २०१६ पासून २५ टक्के अंतरिम वाढ व ६ टक्के महागाई भत्त्याची उर्वरित थकबाकी दिवाळीपूर्वी द्यावी, कनिष्ठ वेतनश्रेणी रद्द करावी, राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळण्यासाठी एसटी शासनात विलीन करावी, शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सातवा वेतन आयोग देण्यात यावा, प्रमादिय कारवाईचा अंतिम निकाल लागेपर्यंत वार्षिक वेतनवाढ न देण्याचे नियमबाह्य परिपत्रक रद्द करावे, थेट प्रवासी नसल्याच्या कारणावरून बंद केलेल्या लांब पल्ल्याच्या फेऱ्या पुन्हा सुरू कराव्या, डावलेल्या सेवा ज्येष्ठता कामगारांच्या बदल्या कराव्या व वेळापत्रकातील नियमबाह्य त्रूटी दूर कराव्या आदी मागण्यांसाठी धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.
आंदोलनाचे नेतृत्व संघटनेचे सचिव नीलेशकुमार वाढ, विलास वानखेडे, शेख इस्माईल, यशवंत कापकर, विठ्ठल गेडाम, किशोर वानखेडे, नथ्थू तडस, रेखा बाळेकरमकर, बी. सी. खांडरे यांनी केले. मागण्या मान्य न झाल्यास भविष्यात आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. (नगर प्रतिनिधी)