एसटीत चालक, वाहक साेडले तर इतरांचे काम सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:39 IST2021-05-08T04:39:03+5:302021-05-08T04:39:03+5:30
काेराेनाचा प्रसार थांबविण्यासाठी शासनाने राज्यभरात संचारबंदी लागू केली आहे. तसेच जिल्हाबंदीही करण्यात आली आहे. त्यामुळे एसटीला प्रवासी मिळणे ...

एसटीत चालक, वाहक साेडले तर इतरांचे काम सुरूच
काेराेनाचा प्रसार थांबविण्यासाठी शासनाने राज्यभरात संचारबंदी लागू केली आहे. तसेच जिल्हाबंदीही करण्यात आली आहे. त्यामुळे एसटीला प्रवासी मिळणे कठीण झाल्याने एसटीची चाके थांबली आहेत. एसटीच्या फेऱ्याच बंद असल्याने चालक व वाहकांना काहीच काम राहिले नाही. चालक व वाहक घरीच आहेत. त्यामुळे एसटीचे सर्वच कर्मचारी घरी असतील असे वाटत असले तरी अधिकारी, प्रशासकीय कर्मचारी, यांत्रिकी कर्मचारी यांना दैनंदिन काम आहे. एसटी अत्यावश्यक सेवेत माेडत असल्याने ५० टक्के कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, प्रत्यक्षात १० ते १५ टक्केच कर्मचारी उपस्थित राहून काम करत आहेत.
बाॅक्स
ही कामे करावे लागतात
प्रशासकीय कर्मचारी व अधिकाऱ्यांना मुंबई येथील केंद्रीय कार्यालयात दैनंदिन माहिती पाठवावीच लागते. तसेच यांत्रिकी कर्मचाऱ्यांना एसटी गाड्यांची देखभाल दुरुस्ती करण्याचे काम करावे लागते. यासाठी यांत्रिकी कर्मचाऱ्यांना दाेन शिफ्टमध्ये बाेलावले जाते.
बाॅक्स
वेतन मिळाल्याने दिलासा
मागील २० दिवसांपासून एसटीची सेवा प्रभावित झाल्याने उत्पन्न ठप्प पडले आहे. अशा स्थितीत वेतन हाेणार की नाही. याबाबत एसटी कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता हाेती. मात्र, ७ मे राेजी कर्मचाऱ्यांचे वेतन झाल्याने दिलासा मिळाला आहे.
आगारातील एकूण कर्मचारी- ४६६
एकूण अधिकारी- ६
चालक-२०७
वाहक-१७७
यांत्रिकी कर्मचारी-५४
प्रशासकीय कर्मचारी-२२