एसटी बसची बकऱ्यांना धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:43 IST2021-08-18T04:43:35+5:302021-08-18T04:43:35+5:30

गुड्डीगुडम : गडचिरोली आगाराच्या बस (एएच ४०, एक्यू ६१२३) या असरअली ते गडचिरोली बसने सकाळी ८ वाजता गुड्डीगुडम गावाजवळ ...

ST bus hits goats | एसटी बसची बकऱ्यांना धडक

एसटी बसची बकऱ्यांना धडक

गुड्डीगुडम : गडचिरोली आगाराच्या बस (एएच ४०, एक्यू ६१२३) या असरअली ते गडचिरोली बसने सकाळी ८ वाजता गुड्डीगुडम गावाजवळ बकऱ्यांना धडक दिली. यात दोन बकऱ्या गंभीर जखमी झाल्या असून त्या मरणासन्न अवस्थेत आहेत.

बस चालक के.डी.मडावी (५०) आणि वाहक तेलसे हे सिरोंचा येथून ५.३० वाजता बस घेऊन निघाले असता गुड्डीगुडम जवळ बकऱ्या रस्त्याच्या कडेने चरण्यासाठी जात होत्या. बस चालकाचे नियंत्रण न राहिल्याने बकऱ्यांना धडक बसली. सिरोंचा ते आलापली मार्गाच्या दुर्दशेमुळे हा अपघात घडला आहे. आजचे वाहन चालक रस्त्याने वाहने हळू चालवत नसल्याने अपघात वाढत आहेत. जखमी बकऱ्यांपैकी एक शंकर तलांडे यांची तर दुसरी गुड्डीगुडम येथील सुरेश भुजाडे यांच्या मालकीची असल्याचे समजते.

170821\1632-img-20210817-wa0007.jpg

Guddigudam येते Assarali गडचिरोली बसने बकरया ना दिली धडक...

Web Title: ST bus hits goats