व्हाॅलिबाॅल व कबड्डी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:44 IST2021-02-20T05:44:22+5:302021-02-20T05:44:22+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कुरखेडा : जिल्हा पाेलीस व मालेवाडा पाेलीस मदत केंद्राच्या संयुक्त विद्यमाने मालेवाडा येथे चारदिवसीय वीर बिरसा ...

व्हाॅलिबाॅल व कबड्डी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
लाेकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : जिल्हा पाेलीस व मालेवाडा पाेलीस मदत केंद्राच्या संयुक्त विद्यमाने मालेवाडा येथे चारदिवसीय वीर बिरसा मुंडा व्हाॅलिबाॅल स्पर्धा व वीर बाबुराव शेडमाके खुल्या कबड्डी स्पर्धेचे आयाेजन मदत केंद्राच्या प्रांगणात करण्यात आले. या स्पर्धेत दाेन्ही खेेळ मिळून एकूण ६९ संघांनी सहभाग घेतला.
स्पर्धेचे उद्घाटन जि.प. सदस्य गीता कुमरे यांचा हस्ते करण्यात आले. याप्रसंगी माजी पं.स. सदस्य तुळशीराम बोगा, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे व्यवस्थापक ठवकर, मालेवाडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. उंदीरवाडे, ग्रा.पं. सदस्य डॉ. मनोहर आत्राम, प्राचार्य जिभकाटे आदी उपस्थित हाेते.
व्हाॅलिबाॅल स्पर्धेत ३१ संघ तर कबड्डी स्पर्धेत ३८ संघांनी सहभाग घेतला. विजेत्या संघांना राेख पुरस्कार व प्रशस्तिपत्र देऊन गाैरविण्यात येणार आहे. कार्यक्रमाला मालेवाडा पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी नारायण राठोड, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण जोगी, पोलीस उपनिरीक्षक विजय कोळी, राज्य राखीव पोलीस दलाचे उपनिरीक्षक प्रफुल्ल वाघमारे, उपनिरीक्षक टी.ए. शेळके तसेच पोलीस कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. यावेळी साईनाथ विद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी तसेच मालेवाडा व परिसरातून आलेले क्रीडा प्रेक्षक व खेळाडू असा ४०० ते ५०० नागरिकांचा जनसमुदाय उपस्थित होते.